Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मिशन विधानसभा : ‘होम पिच’वर महाविकास आघाडीला ‘सेट बॅक’

माजी महापौर योगेश बहल ‘ऑन ॲक्शन मोड’ : आमदार आण्णा बनसोडे यांची ताकद वाढली

पिंपरी : संत तुकाराम नगर येथे होणाऱ्या एकूण मतदानापैकी ७५ टक्के मतदान हे राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांना होईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष माजी महापौर योगेश बहल यांनी व्यक्त केला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांना ‘होम पिच’वर मोठा ‘सेट बॅक’ बसेल, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

पिंपरी विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ संत तुकाराम नगर भागामध्ये पदयात्रा काढण्यात आली यावेळी बहल बोलत होते. यावेळी भाजप नेते व पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, शिक्षण मंडळाचे माजी उपाध्यक्ष माणिकराव अहिरराव, ज्येष्ठ नेते नंदू कदम, माजी नगरसेविका सुजाता पालांडे, माजी नगरसेवक व कामगार नेते यशवंत भोसले, वसंत शेवडे, नारायण बहिरवाडे, जितेंद्र ननवरे, मोहम्मद भाई पानसरे, विजय कापसे, अमिना पानसरे, बबनराव गाढवे, शाम लांडे, संतोष कुदळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष फजल शेख, तुकाराम पडवळ, जयदेव अक्कलकोटे, मायला खत्री, सुनील पालांडे, प्रतिभा जवळकर, निलेश आष्टेकर, राष्ट्रवादी युवती शहराध्यक्ष वर्षा जगताप, ज्ञानेश्वर कांबळे, सतीश लांडगे, हेमंत मोरे, किरण सुवर्णा, संजय अवसरमल, रविंद्र ओव्हाळ, तुकाराम बजबळकर, रमेश चिमूरकर, शिवसेनेचे राजेश वाबळे, दीपक पाटील, दिनेश पाटील, मंगेश धाडगे, अजय चव्हाण, संपत पाचुंदकर, दयानंद पेरकर, राखी धर, राहुल खाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

७५ ते ८० टक्के मतदान आण्णांना होणार…

यावेळी शहराध्यक्ष योगेश बहल म्हणाले, की आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारानिमित्त प्रसन्न वातावरण संत तुकाराम नगर मध्ये निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय व मित्र पक्षांचे सर्व कार्यकर्ते न भूतो न भविष्यती अशा पद्धतीने आज एकत्र आले आहेत. हे पाहता संत तुकाराम नगर मध्ये होणाऱ्या एकूण मतदानापैकी ७५ टक्के मतदान हे अण्णा बनसोडे यांना होऊन ते प्रचंड मतांनी विजयी होतील, असा विश्वास बहल यांनी व्यक्त केला. भाजप नेते व पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे म्हणाले की, संत तुकाराम नगर मध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे अण्णा बनसोडे हे होणाऱ्या मतदानापैकी ७५ ते ८० टक्के मतदान घेऊन विजयी होतील हे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांचे भाकीत खरे ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button