Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘सत्ता हातात द्या पहिल्या ४८ तासांत मशिदीवरचे भोंगे काढतो’; राज ठाकरेंचं विधान

Raj Thackeray | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील वरळी मतदारसंघात जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, यावेळी राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मशिदीवरचे भोंगेंच्या विषयावरून मोठं भाष्य केलं आहे. सत्ता हातात द्या, पहिल्या ४८ तासांत मशिदीवरचे भोंगे काढतो, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

उद्धव ठाकरे कसे मुख्यमंत्री झाले हे सर्वांना माहिती आहे. सध्याच्या काळात काहीही विचारधारा उरलेली नाही. २०१९ नंतर कोणाचं सरकार येणार? हेच आपण पाहत बसलो होतो. एकेदिवशी सकाळी ६ वाजता कळलं की अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे शपथ घेत आहेत. आधी तर विश्वासच बसला नाही. आर्धा तास ते लग्न टिकलं. आर्ध्या तासाच घटस्फोट झाला. त्यानंतर लगेच उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर गेले. मग यांना काही जणाची नाही आणि मनाची नाही. ज्यांच्या विरोधात निवडणुका लढवल्या त्यांच्या बरोबर सत्तेत जाऊन बसले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर अडीच वर्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या अनेक बॅनर्सवरील नावापुढंचं हिंदूहृदयसम्राट हे नाव काढलं. हे का काढलं तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसला वाईट वाटेल आणि त्यांना ते परवडणारं नाही. तसेच काही उर्दू बॅनर्सवर जनाब बाळासाहेब ठाकरे नाव टाकलं. आज ते हयात असायला हवे होते. त्यांनी एकएकाला फोडून काढलं असतं.

हेही वाचा     –      ‘मशि‍दीवरील भोंगे कधीही हटणार नाहीत आणि..’; रामदास आठवलेंची राज ठाकरेंवर टीका 

आज काही मौलवी फतवे काढत आहेत. काय फतवे काढत आहेत? तर सर्वच्या सर्व मते हे महाविकास आघाडीच्या पारड्यात टाकावी. जर ते फतवे काढत असतील तर आज मी देखील फतवा काढतो. येणाऱ्या निवडणुकीमध्ये माझे ज्या मतदारसंघात उमेदवार असतील तेथे जनतेने आमच्या पाठीशी उभे राहावं. उद्या सत्ता हातात दिल्यानंतर पहिल्या ४८ तासांत सर्व मशिदीवरचे भोंगे पहिल्या पहिल्या ४८ तासांत खाली उतरवले ना? तर परत राजकारण सांगणार नाही. जर त्यांनी अंगावर येण्याचा प्रयत्न केला तर हे आमच्या खाकी वर्दीतले आहेत ना त्यांना आदेश देईल आणि ते रजा अकादमीचा बदला घेऊन टाकतील, असंही राज ठाकरे म्हणाले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button