Breaking-newsताज्या घडामोडीपुणे

दिग्गजांनी शक्तिप्रदर्शन करत भरले उमेदवारी अर्ज

पुणे :  पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांत महायुती आणि महाविकास आघाडीच्या काही उमेदवारांनी सोमवारी शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज सादर केले. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मंगळवारी (दि.29) दुपारी तीन वाजेपर्यंत अंतिम मुदत आहे.

अर्ज भरलेल्यांमध्ये प्रामुख्याने वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाकडून बापूसाहेब पठारे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस -अजित पवार पक्षाकडून सुनील टिंगरे, पर्वती विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून माधुरी मिसाळ आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाकडून अश्विनी कदम यांचा समावेश आहे.

हेही वाचा     –        देवेंद्र फडणवीसांनी काढला हुकमी एक्का.. : पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्षपदी शत्रुघ्न काटे

तर, कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून कॉंग्रेसकडून रवींद्र धंगेकर, शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून सिद्धार्थ शिरोळे यांनी, तर अपक्ष म्‍हणून मनीष आनंद यांनी उमेदवारी अर्ज सादर केला.खडकवासला मतदारसंघातून भाजपकडून भीमराव तापकीर यांनी, तर राष्ट्रवादी कॉंग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाकडून सचिन दोडके यांनी उमेदवारी अर्ज भरला. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघातून भाजपकडून सुनील कांबळे यांनी उमेदवारी अर्ज भरला.

हडपसर मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेस-अजित पवार पक्षाकडून चेतन तुपे, राष्ट्रवादी कॉंग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाकडून प्रशांत जगताप आणि मनसेकडून साईनाथ बाबर यांनीही उमेदवारी अर्ज मंगळवारी भरला.कोथरूडमधून अपक्ष उमेदवार विजय डाकले यांनीही अर्ज सादर केला. यावेळी संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button