२१ जागांसाठी ८१८ उमेदवारांनी नेले अर्ज
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/10/Pune-4-2-780x470.jpg)
पुणे : जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि. २५) रोजी चौथ्या दिवशी १६८ उमेदवारांनी अर्ज नेले आहेत. यामध्ये हडपसर, कोथरूड, चिंचवड, पिंपरी आणि कॅन्टोन्मेंटमधून सर्वाधिक उमेदवारांनी अर्ज नेले आहेत.
अद्याप जिल्ह्यातील बऱ्याच मतदारसंघातील उमेदवार निश्चित झाले नाहीत. त्यामुळे खऱ्या अर्थाने अर्ज घेऊन जाणे आणि अर्ज दाखल करण्यासाठी येत्या दोन दिवसांत गर्दी वाढण्याची शक्यता जिल्हा निवडणूक प्रशासनाने व्यक्त केली आहे. आतापर्यंत 21 मतदारसंघातून एकूण ८१८ उमेदवारांनी अर्ज नेले आहेत. तर आतापर्यंत 80 उमेदवारांनी अर्ज भरले आहेत.
हेही वाचा – शरद पवारांना फोडाफोडीचं नोबल दिलं पाहिजे; उदयनराजे भोसलेंचा टोला
विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास सोमवारपासून (दि. २२) सुरुवात झाली आहे, तर येत्या मंगळवारी २९ ऑक्टोबर रोजी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.
त्यामुळे येत्या एक-दोन दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची निवडणूक कार्यालयांत गर्दी होण्याची शक्यता आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ ही सकाळी ११ ते दुपारी ३ अशी आहे.