१६ मतदारसंघात काका विरुद्ध पुतण्या होणार लढत
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट ,यामुळे निवडणुकीत रोमांचक लढत पाहायला मिळणार
![voter, union, uncle, against, nephew, fight, NCP, Congress, Groups, Elections, Exciting](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/10/kaka-ani-putnya-780x470.jpg)
महाराष्ट्र : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. निवडणुकांचे बिगुल वाजताच आता विविध पक्षांकडून उमेदवारांच्या यादी जाहीर केल्या जात आहेत. भाजप, शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गटाकड़ून आतापर्यंत उमेदवारी यादी जाहीर करण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे महाविकासआघाडीकडून ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडून उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली आहे. यंदाच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत होणार आहे. पण त्यातही शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी या लढतींकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून यादी जाहीर करण्यात आली आहे. यात बारामतीतून अजित पवार, परळीतून धनंजय मुंडे, आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील आणि कोपरगावमधून आशुतोष काळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे शरद पवारांनीही या मतदारसंघात त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे तब्बल १६ मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट अशी लढत होणार आहे.
मतदारसंघ राष्ट्रवादी (अजित पवार गट) राष्ट्रवादी (शरद पवार गट)
बारामती अजित पवार युगेंद्र पवार
अहेरी धर्मराव आत्राम भाग्यश्री आत्राम
इंदापूर दत्तात्रय भरणे हर्षवर्धन पाटील
कागल हसन मुश्रीफ समरजीत घाटगे
आंबेगाव दिलीप वळसे देवदत्त निकम
पाटील
मुंब्रा नजीब मुल्ला जितेंद्र आव्हाड
कळवा
वडगाव शेरी सुनील टिंगरे बापूसाहेब पठारे
वसमत चंद्रकांत नवघरे जयप्रकाश दांडेगावकर
हडपसर चेतन तुपे प्रशांत जगताप
चिपळूण शेखर निकम प्रशांत यादव
कोपरगाव आशुतोष काळे संदीप वर्पे
उदगीर संजय बनसोडे सुधाकर भालेराव
इस्लामपूर डॉ निशिकांत जयंत पाटील
पाटील
तासगाव संजयकाका रोहित पाटील
कवठे पाटील
महांकाळ
वडगाव शेरी सुनील टिंगरे बापूसाहेब पठारे
शिरुर ज्ञानेश्वर कटके अशोक पवार