महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? रमेश चेन्निथला म्हणाले..
![Ramesh Chennithala said that our final decision will be taken by 25th](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/10/Ramesh-Chennithala-780x470.jpg)
मुंबई | राज्यात विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. मात्र अजून महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. काल काँग्रेसची एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर रमेश चेन्निथला यांनी महत्वाची माहिती दिली.
२२ ऑक्टोबरला तीन वाजता मुंबईत महाविकास आघाडीची बैठक होईल. त्यानंतर २५ तारखेला आमची एक बैठक होईल. महाविकास आघाडीच्या सर्व जागांचा तिढा सुटेल आणि आम्ही जागावाटप जाहीर करु, असं रमेश चेन्निथला म्हणाले. तसेच, आजच्या बैठकीत आम्ही ६३ जागांबाबत चर्चा केली. त्याबाबत अंतिम निर्णय झाल्यानंतर त्याची माहिती माध्यमांना दिली जाईल. मुंबईत आम्ही आमच्या मित्रपक्षांशी चर्चा केल्यानंतर यादी जाहीर करु असंही चेन्निथला म्हणाले.
हेही वाचा – पंकजा मुंडेंनी अचानक रात्री अजितदादांची घेतली भेट
महाराष्ट्र विधानसभेच्या दृष्टीने आमची चांगली तयारी चालली आहे. जागांबाबत आमची चर्चा सुरु आहे. तसंच आमच्यात कुठलेही मतभेद किंवा वाद नाहीत. राहुल गांधी, प्रियांका गांधी हे देखील प्रचार करतील असंही चेन्निथला यांनी म्हटलं आहे. आघाडी म्हटलं की अशा प्रकारच्या काही गोष्टी होत असतात. पण आमचा अंतिम निर्णय २५ तारखेपर्यंत होईल असंही चेन्निथला यांनी स्पष्ट केलं.