Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेला स्थगिती, नेमकं कारण काय?

Mukhyamantri Ladki Bahin Yojana | विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर निवडणूक आयोगाकडून मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक योजना बंद करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्या आहेत. मात्र त्यानंतर महायुतीची महत्वाकांक्षी योजना असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला सुद्धा तात्पुरता ब्रेक लागला आहे. त्यामुळे आता लाडकी बहीण योजना बंद झाल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे. मात्र आता यासंदर्भात महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत खुलासा केला आहे.

मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट करून म्हटले आहे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार..मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै २०२४ पासून सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र भगिनींना दरमहा १५०० रुपये थेट त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केले आहेत. शासनाने जुलै, ऑगस्ट, आणि सप्टेंबर २०२४ या महिन्यांसाठीचा लाभ आधीच पात्र भगिनींच्या खात्यात जमा केला आहे.तसेच ४ ते ६ ऑक्टोबर २०२४ दरम्यान ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांचा लाभ राज्यातील २ कोटी ३४ लाख पात्र भगिनींना देण्यात आला आहे. सर्व पात्र भगिनींना डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यात देण्यात येणार असून या योजनेबाबत कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील माता भगिनींनी बळी पडू नये ही नम्र विनंती त्यांनी केली आहे.

हेही वाचा     –        गौरी लंकेश हत्याकांडातील आरोपी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल

निवडणूक आयोगाने आर्थिक लाभ देत असलेल्या आणि मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या योजना त्वरीत थांबवल्या पाहिजेत, अशी सूचना सर्व प्रशासकीय विभागांना दिली आहे. महिला आणि बालकल्याण विभागाकडून लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ दिला जात असल्याचं समोर आल्यानंतर विभागाकडून योजनेची माहिती मागवण्यात आली. विभागाने या योजनेसाठीचे निधी वितरण चार दिवसांपूर्वीच थांबवल्याची माहिती आयोगाला दिली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button