पिंपरी विधानसभेत एकही संवेदनशील मतदान केंद्र नाही
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/10/mahaenews-14-780x470.jpg)
पिंपरी : पिंपरी विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत एकूण 3 लाख 87 हजार 973 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदार संघात एका मतदान केंद्रावर मतदारांची संख्या सरासरी 975 असणार आहे.
तर एकून मतदान ठिकाणे 87 असून, त्यामधील 398 मतदान केंद्रांवर हे मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. या मतदार संघात एकही संवेदनशील मतदान केंद्र नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील सर्वच मतदार संघातील तयारीचा आढावा घेतला आहे.काही महिन्यांपुर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांच्या संख्येत काही प्रमाणात बदल झाल आहे.विधानसभा निवडणुकीत मतदानाकरिता आणल्या जाणार्या ईव्हीएम मशिनमहापालिकेच्या निगडीतील नेताजी सुभषाचंद्र बोस बॅडमिंटन हॉल येथील स्ट्राँगरूममध्ये ठेवल्या जाणार आहेत.
हेही वाचा – भाजपची पहिली यादी आज जाहीर होणार, कोणाला संधी कोणाला धक्का?
तर चिंचवड येथील ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटरमधून अधिकारी व कर्मचार्यांना मतदानाचे साहित्य वाटप केले जाणार असून, मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर याचठिकाणी हे मतदान साहित्य जमा करुन घेतले जाणार आहे.त्यानंतर कडेकोट बंदोबस्तामध्ये या ईव्हीएम मशिन बालेवाडी येथील शिवछत्रपती स्टेडियममधील स्ट्राँगरूममध्ये सुरक्षितपणे ठेवले जाणार आहे.
मतदानाचा टक्का वाढावा, याकरिता निवडणूक आयोगाच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत.या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीकरिता मोरवाडीतील त्रिवेणी व रिवरडेल सहकारी गृहनिर्माण सोसायटी, म्हाडा कॉलनीमध्ये प्रत्येकी दोन अशी एकीण चार मतदान केंद्र तर कासारवडीतील मंत्री इटेरनिटीसोसायटीमध्ये एकूण दोन मतदान केंद्र असणार आहेत.
या मतदार संघात एकूण 3 लाख 87 हजार 973 मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार 1 लाख 85 हजार415, तर महिला मतदारांची संख्या 2 लाख 2 हजार 524 एवढी सून पुरुष मतदारांच्या तुकनेत ही संख्या 17 हजार 109 ने अधिक आहे. तर सैनिक मतदार 975,असून तृतीयपंथी मतदारांची संख्या 34 एवढी आहे.
विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याकरिता मागस प्रवर्गातील उमेदवाराला 5 हजार रुपये तर खूल्या प्रवर्गातील उमेदवाराला 0 हजार रुपये अनमात रक्कम जमा करावी लागणार आहे.याशिवाय या निवडणुकीकरिता प्रत्येक उमेदवाराला 40 लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा आहे. निवडणुकीसाठी होणार्या खर्चाची नोंद ठेवून त्याचा तपशील दररोज निवडणूक कार्यालयाकडे जमा करावयाचा आहे. त्याकरिता बँकेत उमेदवाराने स्वतंत्र खाते सुरू करायचे आहे.