ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नाशिक शहरात महिलांना हक्काचा रोजगार

महिला व बालविकास विभागातर्फे शहरातील ७०० महिलांना 'पिंक ई-रिक्षा'

नाशिक : महिलांना हक्काचा रोजगार मिळवून देण्यासाठी महिला व बालविकास विभागातर्फे शहरातील ७०० महिलांना पिंक ई-रिक्षा दिल्या जाणार आहेत. प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसर होत आहेत. त्यात रिक्षा चालवणे, स्कूल व्हॅन आदी चारचाकी वाहने चालवण्यात महिला पारंगत झाल्या आहेत. त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पिंक ई-रिक्षा देण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाकडे ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करता येतील.

याशिवाय www.nashik.gov.in या संकेतस्थळावर, महापालिका, नाशिक मुख्य कार्यालय व जवळच्या अंगणवाडी केंद्रातही अर्ज उपलब्ध आहेत. इच्छुक महिलांनी आपले अर्ज आवश्यक कागदपत्रांसह सादर करावेत, अशी माहिती महिला व बाल विकास अधिकारी सुनील दुसाने यांनी दिली.

लाभासाठी पात्रता

-लाभार्थी महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी

-२० ते ४० वर्षे वय आवश्यक

-कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रुपये ३ लाखांपेक्षा अधिक नसावे

-विधवा, कायद्याने घटस्फोटीत, राज्यातील इच्छुक प्रवेशित, अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युवती, अनुरक्षणगृह,बालगृहातील आजी, माजी प्रवेशिता तसेच दारिद्र्यरेषेखालील महिलांना प्राधान्य

-ई-रिक्षा किमतीच्या ७० टक्के रक्कम बँक कर्ज व २० टक्के रक्कम राज्य शासन हिस्सा याप्रमाणे असून १० टक्के रक्कम पात्र लाभार्थीने स्वत: भरावी

-कर्जाची परतफेड लाभार्थीने ५ वर्ष (६० महिने) कालावधी

-योजनेचा लाभ लाभार्थी महिलेला एकदाच घेता येईल

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button