Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पुण्यात पंतप्रधान मोदींच्या जीवाला धोका…! आपत्कालीन नियंत्रण कक्षाला कॉल

पिंपरी : पुण्यात दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवाला धोका असून त्यांना वाचवा, अशा आशयाचा कॉल एका अभियंत्याने आपत्कालीन नियंत्रण कक्षाला केला. त्यानंतर राज्य पोलीस दलात एकच खळबळ उडाली. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अवघ्या काही मिनिटातच संबंधित तरुणांना ताब्यात घेतले असून त्याच्याकडे कसून चौकशी सुरू आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज पुणे दौरा नियोजित होता. मेट्रोसह एकूण १२ प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन त्यांच्या हस्ते संपन्न होणार होते. मात्र, पुणे शहर परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे मोदी यांचा आजचा दौरा रद्द करण्यात आला आहे.

हेही वाचा –  BIG NEWS : तळवडे येथील बायोडायर्व्हसिटी पार्कला प्रशासनाचा ग्रीन सिग्नल

दरम्यान, आज गुरुवार (दि. २६) सकाळी एका अभियंता तरुणाने “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाचवा…, त्यांना मदत करा”, असा कॉल आपत्कालीन नियंत्रण कक्षाला केला. या कॉल नंतर राज्य पोलीस दलात एकच खळबळ उडाली. तांत्रिक तपासाद्वारे हा तरुण पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील थेरगाव परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, काही मिनिटातच वाकड पोलिसांनी बस थांब्यावर बसची वाट पाहत असलेल्या तरुणाला ताब्यात घेतले. तरुण मूळचा उदगीर येथील असून तो थेरगाव येथे त्याच्या मित्राकडे आला होता.

अभियंता तरुणाने असा कॉल का केला. तसेच, त्याच्याकडे नेमकी काय माहिती आहे, याची कसून चौकशी सुरू आहे. पोलिसांसह राज्य दहशतवाद विरोधी पथकाने देखील या कॉलची गंभीर दखल घेतली असून त्यांच्याकडून देखील समांतर चौकशी सुरू आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button