Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

Big news: दिघीत लाच प्रकरणात माजी आमदारांचा कट्टर समर्थक गजाआड; राजकीय वर्तुळात खळबळ!

उत्पन्नाचा दाखला, डोमेसाईलसाठी मागीतली ५ हजारांची लाच

पिंपरी: उत्पन्नाचा दाखला आणि डोमेसाईल सर्टिफिकेट (Dighi) काढून देण्यासाठी शासकीय फी व्यतिरिक्त पाच हजारांची लाच मागितल्या प्रकरणी महा-ई-सेवा केंद्र चालक आणि तिथे काम करणाऱ्या महिलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. ही कारवाई बुधवारी (दि. 18) दिघी येथे करण्यात आली. विशेष म्हणजे, सदर व्यक्ती पिंपरी-चिंचवडमधील एका माजी अमदारांचा कट्टर समर्थक आहे. त्यामुळे शहराच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

संतोष बबन वाळके (वय 48, रा. दिघी), कॉम्प्युटर ऑपरेटर महिला (वय 36) या दोघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी 54 वर्षीय व्यक्तीने एसीबीकडे तक्रार केली आहे.

एसीबीचे सहाय्यक पोलीस आयुक्त दयानंद गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे दिघी येथील गुरुदेव दत्त महा-ई-सेवा केंद्र येथे उत्पन्नाचा दाखला आणि डोमेसाईल सर्टिफिकेट काढण्यासाठी गेले होते. आमची तहसील कार्यालयात ओळख आहे, असे म्हणत आरोपींनी हे काम करून देण्यासाठी पाच हजार रुपये द्यावे लागतील अशी मागणी केली.

याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली. एसीबीच्या पथकाने बुधवारी गुरुदेव दत्त महा-ई-सेवा केंद्र येथे सापळा लावला. मागितलेल्या लाच रकमेपैकी अडीच हजार रुपये लाच रक्कम स्वीकारताना एसीबीने दोघांना ताब्यात घेतले. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीचे पोलीस निरीक्षक वीरनाथ माने तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button