ताज्या घडामोडीमुंबईराजकारण

लुटीचा पैसा आनंद आश्रमात ठेवला जातो : संजय राऊत

संजय राऊत यांच्यामुळेच आनंद दिघेंना टाडा, शिंदे गटाच्या खासदाराचा आरोप

ठाणे : ठाणे येथील टेंभीनाका परिसरातील आनंद आश्रमात पैसे उधळण्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर उलट सुलट प्रतिक्रीया येत आहेत. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी देखील या व्हिडीओ वरुन एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर टिका केली आहे. या संदर्भात आता लुटीचा पैसा आनंद आश्रमात ठेवला जातो असा आरोप करीत आज जर आनंद दिघे असते तर त्यांनी त्यांच्या त्या प्रसिद्ध हंटरने पैशाची उधळपट्टी करणाऱ्यांना फोडून काढले असते अशी टिका संजय राऊत यांनी केली आहे. या संदर्भात ठाण्याचे एकनाश शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी टिका केली आहे.

संजय राऊत यांनी आनंद आश्रमातील व्हिडीओवर केलेल्या टिप्पणीचा खासदार नरेश म्हस्के यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. लुटीचे पैसे त्या ठिकाणी ठेवले जात असल्याचा संजय राऊत यांचा आरोप असेल तर तो धर्मवीर आनंद साहेब यांचा अपमान आहे असे नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे. संजय राऊत हा दिघे द्वेष्टा माणूस आहे. दिघे साहेबांचा या माणसाने कायम तिरस्कार केलेला आहे. या माणसाने कायमच दिघे यांना विरोध केला आहे. खोपकर हत्याकांडा नंतर संजय राऊत यांनी लोकप्रभामध्ये जो लेख लिहीला होता. त्यात काही गोष्टी त्यांनी लिहीलेल्या होत्या. त्यामुळे दिघे साहेबांना टाडा लागला आणि दिघे यांना तुरुंगात हालअपेष्टा सहन कराव्या लागल्याचे नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे.

आम्हाला दिघे साहेब शिकविण्याचा प्रयत्न करु नये
बाळासाहेबांकडे कायम दिघे साहेबांविषयी तक्रार करणे, त्यांच्याविषयी चुकीचं सांगणे हे काम संजय राऊत कायम करीत आले आहेत. या सर्व मंडळींनी एकत्र येऊन दिघे साहेबांना राजकारणातून संपवण्याची यांनी सुपारी घेतली होती आणि त्यामुळे दिघे साहेब व्यथित सुद्धा झाले होते. त्यांनी आम्हाला दिघे साहेब शिकवण्याचा प्रयत्न करू नये, दिघे साहेब गेल्यानंतर यांना कधी दिघे साहेबांची यांनी कधी आठवण आली का ?, काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाला दिघे साहेबांचं नाव देण्याचा ठराव या लोकांनी आम्हाला मागे घ्यायला लावला, या नाट्यगृहाला दिघे साहेबांचं नाव देऊ दिलं नाही, एवढा तिरस्कार ही मंडळी करायची असेही म्हस्के यांनी म्हटले आहे. अशा प्रकारे जर संजय राऊत बोलत असतील तर त्यांच्या सभोवतालची, जी उबाठाची ठाण्यातील मंडळी आहे ती कोण आहेत ? ज्यांनी कायम दिघे साहेबांचा तिरस्कार केला. शिवसेनेत काम करीत असताना दिघे साहेबांच्या विरुद्ध शिवसेनेत वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न केला अशीच ठाणे जिल्ह्यातली मंडळी त्यांच्याबरोबर आहेत असाही आरोप नरेश म्हस्के यांनी केला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button