राहुल गांधीचे आरक्षणाविषयी मोठं वक्तव्य
ज्यावेळी योग्य वेळ येईल. त्यावेळी आरक्षण संपेल,सध्या योग्य वेळ नाही.
मुंबई : राहुल गांधी अमेरिकन दौऱ्यावर असताना देशातील आरक्षणाविषयी मोठे भाष्य केले. त्यांनी अनेक मुद्यांवर तिथल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी देशातील आरक्षण किती संपणार? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर ज्यावेळी योग्य वेळ येईल. त्यावेळी आरक्षण संपेल. पण सध्या ती योग्य वेळ नसल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला होता. या विधानाचे पडसाद भारतात लागलीच उमटले. सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधी यांच्यावर टीकेची झोड उठवली. राहुल गांधी हे आरक्षणाचे मारेकरी असल्याचा प्रहार सुरू केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आरक्षणाचा मुद्दा तापणार हे वेगळं सांगायला नको.
राहुल गांधी यांचे वक्तव्य काय?
देशात सध्या आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. प्रत्येक राज्यातील आरक्षणापासून वंचित जाती, आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी संघर्ष करत आहेत. आंदोलने सुरु आहेत. याविषयी विद्यार्थ्यांनी राहुल गांधी यांना प्रश्न केला. त्यावेळी आरक्षण संपविण्याविषयी राहुल गांधी यांनी महत्वाचे वक्तव्य केले. ज्यावेळी योग्य वेळ येईल, त्यावेळी काँग्रेस आरक्षण संपविण्याचा विचार करेल. सध्या योग्य वेळ नसल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला.





