breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकावर बेछुट गोळीबार, नंतर कोयत्यानं वार

पुणे : सुसंस्कृत पुण्यात नेमकं चाललंय काय? असा प्रश्न सध्या खरंच ऐरणीवर आला आहे. पुण्यात राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवक वनराज आंदेरकर  यांच्यावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. एवढंच नाहीतर गोळीबारानंतर वनराज आंदेकरांवर कोयत्यानं सपासप वारही केले. हल्लेखोरांनी आंदेरकरांवर तब्बल पाच गोळ्या झाडल्या आणि तिथून फरार झाले. दरम्यान, वनराज आंदेकर  हा राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. मात्र, घरगुती वादातून नातेवाईकानं हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

वनराज आंदेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक. गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. मात्र, घरगुती वादातून नातेवाईकानं हत्या केल्याचं बोललं जात आहे. या घटनेत 5 राउंड फायर झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या गोळीबारात वनराज गंभीर जखमी झाले. त्यानंतर हल्लेखोर तिथून फरार झाले. हल्ला झाल्यानंतर घटनास्थळी समर्थ पोलिसांसह गुन्हे शाखा दाखल झाली आणि त्यांनी तपास सुरू केला. याप्रकरणी पोलीस प्रत्येक धागेदोरे कसून तपासत आहेत.

हेही वाचा –  ‘खोडा घालणाऱ्यांना लाडक्या बहिणी जोडा मारतील’; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा

पुण्याचे पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी बोलताना सांगितलं की, रविवारी संध्याकाळी (2 सप्टेंबर) साडेनऊ वाजता दोन जण नाना पेठेतील परिसरात उभे होते. यावेळी काही अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला, त्यात वनराज आंदेकर यांचा मृत्यू झाला आहे. वनराज आंदेकर यांचा मृतदेह ससून रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्यांच्यावर पाच राऊंड फायर करण्यात आले आणि तीक्ष्ण हत्यारानं त्यांच्यावर वार करण्यात आले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हे कृत्य नेमकं कशामुळे केलं आहे, हे अद्याप स्पष्ट आहे. मात्र, या आरोपींचा शोध घेणं हे शोधण्यासाठी आमचं पथक रवाना करण्यात आलेले आहेत.

पुण्यातील मध्यभागात रविवारी गोळीबाराचा थरार रंगल्याचं पाहायला मिळालं. वनराज आंदेकर या राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकावर त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. वनराज आंदेकराची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. मात्र, घरगुती वादातून नातेवाईकानं हत्या केली. या घटनेत 5 राउंड फायर झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

गोळीबार करून कोयत्यानं वार केल. आधी चौकातले लाईट घालवले. आणि एकटा असल्याचं पाहून हल्ला केला. घरातील कार्यक्रम असल्यामुळे आंदेकर यांच्यासोबत इतर सहकारी नव्हते. नेमकी हीच संधी साधून दुचाकीवरून आलेल्या तीन ते चार जणांनी आधी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि त्यानंतर कोयत्यानं वार केले. गंभीर जखमी झालेल्या आंदेकर यांना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आंदेकर हा राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी होती. मात्र, घरगुती वादातून नातेवाईकानं हत्या केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button