समाजाने अंधश्रद्धा कर्मकांडापासून दूर रहावे; प्रकाश जाधव
मराठा सेवा संघ वर्धापन दिन कार्यक्रमाचे चिंचवड येथे आयोजन

पिंपरी | समाजाने अंधश्रद्धा कर्मकांड अनिष्ठ रूढी परंपरा यापासून दूर रहावे वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा आपल्या बरोबर सर्व समाजाच्या विकासात योगदान द्यावे असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रकाश जाधव यांनी केले. मराठा सेवा संघाच्या ३४ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतिश काळे व त्यांचे सहकार्यांनी रविवार (दि.1) रोजी भोईर व्यायामशाळा चिंचवड येथे केले होते.
यावेळी मराठा सेवा संघ शहराध्यक्ष आबासाहेब ढवळे यांचा पिंपरी चिंचवड महापालिकेतून सेवानिवृत्त झाल्याबद्दल आयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सेवानिवृत्त अधिकारी व मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष आबासाहेब ढवळे आपल्या मनोगत म्हणाले की, दोनच दिवसांपूर्वी शासकीय सेवेतून निवृत्त झालो लहानपणा पासूनच समाजासाठी काम करण्याची इच्छा होती. पण शासकीय नोकरीमुळे बंधने होती आता पुढील आयुष्यात समाजातील गरजूंसाठी वेळ देणार आणि मदत करणार असल्याचे आबासाहेब ढवळे म्हणाले.
हेही वाचा – बारामतीमधून विधानसभा निवडणूक लढणार का? जय पवारांचं सूचक विधान; म्हणाले..

यावेळेस मनोज गरबडे, आम आदमी पार्टीचे सचिन पवार, जिजाऊ ब्रिगेड पुणे विभागीय अध्यक्षा सुनिता शिंदे, जिल्हा सचिव वृषाली साठे, शहराध्यक्षा सुलभा यादव, संभाजी ब्रिगेडचे प्रविण कदम, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्षा मनीषा हेंम्बाडे, चैताली भोईर यांनी शुभेच्छापर मनोगते व्यक्त केली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे शहर सचिव रावसाहेब गंगाधरे, शहर उपाध्यक्ष अभिषेक गायकवाड, उद्योजक विलास भोईर, साहेबराव साळुंके, नकुल भोईर, अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिध्दिकभाई शेख, वाल्मीक माने, वसंत पाटील, उज्वला साळुंखे, कौशल्या जाधव, संध्या भालेराव, प्रशांत काळे, गणेश पवार, आयोजक संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष सतिश काळे यांचेसह मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेडचे पदाधिकारी व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिजाऊ वंदना रत्नप्रभा सातपुते यांनी म्हटली. सूत्रसंचालन वैभव जाधव यांनी केले तर आभार नकुल भोईर यांनी मानले.





