breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

१ सप्टेंबरपासून ‘हे’ ५ मोठे बदल होणार, सर्वसामन्यांच्या खिशाला कात्री लागणार?

September 2024 New Rules | उद्या म्हणजेच रविवारपासून सप्टेंबर महिन्याची सुरूवात होणार आहे. या महिन्याच्या पहिल्या दिवसापासून देशात पाच मोठे बदल होणार आहे. ज्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये नेमके कोणते नवे नियम लागू होणार हे समजून घ्या..

एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत बदल होऊ शकतो. ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत ८.५० रूपयांनी वाढली होती तर जुलैमध्ये त्याची किंमत ३० रूपयांनी कमी झाली होती. माहितीनुसार या महिन्यात व्यावसायिक आणि घरगुती गॅसच्या किंमतीमध्ये कपात होण्याची शक्यता आहे.

एव्हिएशन टर्बाइन फ्लूल (ATF) आणि सीएनजी-पीएनजीच्या दरांमध्ये देखील १ सप्टेंबरपासून बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याचा थेट परिणाम वाहतूक खर्च आणि इतर वस्तूंच्या किमतींवर होणार आहे. या बदलाचा सर्वात मोठा परिणाम कार मालक, पीएनजी ग्राहक आणि वारंवार प्रवास करणाऱ्यांना ग्राहकांवर होणार आहे.

हेही वाचा    –    असंगाशी संग..अजित पवार गटासोबत झालेली युती दुर्दैवी; भाजप नेत्याचं विधान 

१ सप्टेंबरपासून नवीन क्रेडिट कार्ड नियम देखील लागू होणार आहे. माहितीनुसार, १ सप्टेंबरपासून HDFC बँकेने युटिलिटी बिल पेमेंटसाठी रिवॉर्ड पॉइंट्ससाठी मर्यादा लागू केली आहे तर IDFC फर्स्ट बँकेने पेमेंट नियम बदलले आहेत.

फेक कॉल आणि मेसेजच्या विरोधात देखील १ सप्टेंबरपासून कडक कारवाई करण्यात येणार आहे. टेलीमार्केटिंग कंपन्यांना ३० सप्टेंबरपर्यंत नवीन ब्लॉकचेन-आधारित प्रोसेस बदलावी लागणार आहे. ज्यामुळे ग्राहकांची सुरक्षा वाढेल आणि स्पॅम कॉल्स कमी होणार आहे.

तर सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत UIDAI ने आधार कार्ड अपडेट करण्याची तारीख वाढवली आहे. तुम्हाला आता ही सुविधा १४ सप्टेंबर २०२४ पर्यंत मिळणार आहे. यापूर्वी ही तारीख १४ सप्टेंबरपर्यंत होती. त्यामुळे UIDAI ने नागरिकांना लवकरात लवकर आधार कार्ड अपडेट करण्याचे आवाहन केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button