breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिखली, कुदळवाडी, तळवडेतील 26 धोकादायक आस्थापना सील

पिंपरी : अग्निप्रतिबंधक उपाययोजनेबरोबरच अन्य बाबींकडे दुर्लक्ष करणे औद्योगिक व व्यावसायिक मिळकतींना चांगलेच महागात पडले आहे. या उपाययोजना राबविण्यात बाबत दोन वेळा नोटीस बजावूनदेखील त्याकडे दुर्लक्ष करणार्‍या एकूण 26 मिळकती महापालिका प्रशासनाने सील केल्या आहेत. चिखली, कुदळवाडी व तळवडे मिळकतींच यामध्ये समावेश आहे.

तळवडेमधील कारखान्यात झालेल्या दुर्घनटेत जिवीतहानीच्या घटनेनंतर राज्य पातळीवर याचे तीव्र पडसाद उमटले होते. राज्य सरकारने याची गंभीर दखल घेत, तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले होते.तर विधानपरिषदचया उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी याबाबत विशेष बैैठकीचे आयोजन करत, संबंधित यंत्रणांनी समन्वय ठेवत उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिला होते.

हेही वाचा    –    ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस सोन्याचे व चांदीचे भाव काय आहेत?

या सर्व घडामोडीनंतर सतर्क झालेल्या महापालिका प्रशासनाने महिला बचत गटांमार्फत शहरातील धोकादायक औद्योगिक व व्यावसायिक अस्थापनांचे सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणात अनेक त्रुटी समोर आल्या होत्या. यामध्ये अग्निप्रतिबंधक उपाययोजना नसणे, आपत्कालीन बाहेर पडण्याच्या मार्गाचा अभाव, धोकादायक पदार्थांचा साठा करणे तसेच व्यवसायिक आस्थापनामध्ये वास्तव्य करत असल्याच्या बाबी समोर आल्या होत्या.

दरम्यान, या सर्व त्रुटी पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासनाने या आस्थापनांना मुदत देत, नोटीस बजावली होती. या नोटीसढ़शीनंतर अनेक आस्थापनांनी या त्रुटींची पूर्तता केली.

मात्र. महापालिकेच्या दुसर्‍या नोटीशीनंतरदेखील 26 औद्योगिक व व्यवसायिक आस्थापनांनी त्यावर कोणतीही कार्यवाही केली नसल्याची बाब समोर आली. त्यामुळे महापालिका प्रशासनाने चिखली, कुदळवाडी व तळवडे भागातील या मिळकती सील केल्या आहेत.

या धोकादायक आस्थापनांना नोटीस बजावताना त्रुटींची पूर्तता न केल्यास वीज व पाणीपुरवठा खंडीत करण्याची बाब नमूद केली होती.त्यामुळे वेळेत त्रुटींची पूर्तता न करणार्‍या या आस्थापनांचा वीजपुरवठा व पाणीपुरवठादेखील खंडीत करण्यात आला आहे. पुढील काळातही शहरातील धोकादायक अस्थापनांवरील कारवाई सुरू राहणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button