महिलांसाठी १० सर्वात धोकादायक देशांची यादी जाहीर, भारताचा नंबर कितवा?

10 Most Dangerous Countries for Female | जगातील अशा १० देशांची यादी जाहीर करण्यात आली आहे, जे महिलांसाठी सर्वात धोकादायक आहेत. येथे महिलांना एकटे फिरणे असुरक्षित वाटते. र्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यू वुमन डेंजर इंडेक्सने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
महिलांसाठी असुरक्षित देशात द. आफ्रिका पहिल्या स्थानावर असून २५ टक्के महिलांना रात्री एकटे चालणे सुरक्षित वाटते. दुसऱ्या क्रमांकावरील देश ब्राझीलमध्ये हेच प्रमाण २८ टक्के आहे. रशिया तिसऱ्या स्थानावर आहे जिथे महिला सुरक्षित नाहीत. मेक्सिको चौथ्या क्रमांकावर आहे. येथेही महिलांच्या मोठ्या प्रमाणावर हत्या होतात.
हेही वाचा – ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस सोन्याचे व चांदीचे भाव काय आहेत?

इराण हा जगातील पाचवा देश आहे जिथे महिलांना सर्वात जास्त असुरक्षित वाटते. डोमिनिकन रिपब्लिकमधील केवळ ३३% महिलांना रात्री एकट्याने प्रवास करणे सुरक्षित वाटते. तर सातव्या क्रमांकावर इजिप्त आहे. त्यानंतर मोरोक्कोचा नंबर लागतो. या यादीत भारताच्या नावाचाही समावेश आहे. देशातील ३७.२% महिलांना एकट्याने प्रवास करणे असुरक्षित वाटते. महिलांसाठी जगातील सर्वात धोकादायक देशांच्या यादीत थायलंड दहाव्या क्रमांकावर आहे.





