राज्यात पुन्हा पाऊस धुमाकूळ घालणार! ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

पुणे | राज्यातील पावसासंदर्भातील मोठी अपडेट्स समोर आली आहे. राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झाला आहे. राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस कोसळणार आहे असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन देखील करण्यात आलं आहे.
हवामान विभागाने विदर्भ, खान्देश, मध्य महाराष्ट्र व कोकणातील सर्वच जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. याशिवाय मराठवाड्यातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज आहे.
आयएमडीच्या अंदाजानुसार, आज कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नुंदरबार आणि सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊसाचा इशारा आहे. उर्वरित राज्यात मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. मराठवाडा विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – बदलापुरातील चिमुकल्या मुलींवरील अत्याचार प्रकरणी नागरिक आक्रमक, पालकांचं शाळेसमोर आंदोलन
भारतीय हवामान विभागाने आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, नंदुरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडू शकतो. दुसरीकडे विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.





