‘बारामतीच्या नादी लागून सत्ता मिळणार नाही’ भाजप समर्थकांचे राज ठाकरेंना उत्तर
मुंबई– महाराष्ट्र नवीनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी आज आपल्या व्यंगचित्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले आहे. राज्यात २०१ तालुक्यात दुष्काळ असून खरिपाबरोबर यंदा रब्बी हंगामही धोक्यात आहे. राज्याची आर्थिक परिस्थितीही बिकट आहे. अशा परिस्थितीतही देवेंद्र फडणवीस पुढचा मुख्यमंत्रीही मीच राहणार, असे व्यंगचित्रात दाखवले आहे.
राज ठाकरेंनी काढलेले व्यंगचित्र
राज ठाकरेंनी सोशल मीडियावर हे व्यंगचित्र प्रसिद्ध करताच काही वेळानंतर भाजप समर्थकांनी त्याला जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. समर्थानी राज ठाकरेंना एका बोटेत दाखवले असून त्यावर ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजाची लहरी स्थिती’,असे लिहीले आहे.‘मला एकहाती सत्ता द्या’ असेही राज ठाकरे म्हणताना दाखवले आहे.
“बारामतीच्या नादी लागून सत्ता मिळणार नाही. त्यासाठी नेते आणि कार्यकर्तेही हवेत, बारामतीच्या इशाऱ्यावर चालणाऱ्या बोलघेवड्याला कंटाळून मनसे कार्यकर्ते राजाची साथ सोडून चालले. २०१९ ची निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्ते नाहीत” असाही चिमटा व्यंगचित्रातू काढण्यात आला आहे.