breaking-newsTOP Newsपुणे

पुणेकरांसाठी खुशखबर! स्‍वारगेट-कात्रज मेट्रोच्‍या विस्‍तारीत मार्गाला मंजुरी

पुणे :  पुणे मेट्रोच्या पीसीएमसी ते स्वारगेट या सध्याच्या पहिल्या टप्प्याच्या स्वारगेट ते कात्रज अशा भूमिगत मार्ग प्रकल्प विस्ताराला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्‍यात आली आहे. या नवीन विस्तारित प्रकल्पाची लाईन-1 बी विस्तार अशी ओळख आहे आणि त्याचा विस्तार 5.46 किमी असेल. या विस्तारित प्रकल्पात तीन भूमिगत स्थानकांचा समावेश असेल, जे मार्केट यार्ड, बिबवेवाडी, बालाजी नगर आणि कात्रज उपनगर यासारख्या प्रमुख भागांना जोडेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्‍या बैठकीत हा निर्णय घेण्‍यात आला आहे. पुण्यामध्ये अतिशय सुलभ दळणवळण सुविधा उपलब्ध करण्याचा उद्देश असलेला हा प्रकल्प फेब्रुवारी 2029 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पाचा अंदाजे खर्च रु. 2954.53 कोटी आहे, ज्यासाठी भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्या समान वाट्यातून तसेच द्विपक्षीय संस्था आदींच्या योगदानासह निधी पुरवला जाईल.

हेही वाचा    –      लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी १९९ कोटींचा खर्च! विरोधकांचा आक्षेप 

या विस्तारामुळे स्वारगेट मल्टीमॉडल हबचे एकात्मिकरण होईल ज्यामध्ये मेट्रो स्थानक, एमएसआरटीसी बस स्थानक आणि पीएमपीएमएल बस स्थानकाचा समावेश आहे. जे पुणे शहरातील आणि बाहेरील प्रवाशांसाठी अतिशय चांगल्या प्रकारची संपर्कव्यवस्था प्रदान करेल. या विस्तारामुळे पुण्याचा दक्षिणेकडील भाग, पुण्याचा उत्तरेकडील भाग आणि जिल्हा न्यायालय इंटरचेंज स्टेशनद्वारे पूर्व आणि पश्चिम विभाग यांच्यातील संपर्कव्यवस्था वाढेल, ज्यामुळे पुणे शहरामध्ये आणि बाहेरील प्रवासासाठी सुविहित दळणवळण सुविधा मिळेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button