breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

नीलम गोऱ्हे यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा, मुख्यमंत्री सचिवालयाकडून निर्णय जाहीर

नीलम गोऱ्हे शिंदे गटाच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री

मुंबई | विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांना आता कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा मिळाला आहे. शिवसेनेच्या पहिल्या महिला मंत्री म्हणून नीलम गोऱ्हे यांना मान मिळाला आहे. याबाबतची माहिती त्यांनी स्वत:हून दिली आहे.

कॅबिनेट मंत्रीपदाची माहिती देताना नीलम गोऱ्हे म्हणाल्या, मुख्यमंत्री सचिवालयाकडून प्रत आलेली आहे. कॅबिनेट पदाचा दर्जा मला दिलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. महिलांना कॅबिनेट मंत्री पद मिळालेलं आहे. पण शिवसेनेतील महिलेला कॅबिनेट मंत्रीपद मिळणारी मी पहिलीच व्यक्ती आहे, त्याबद्दल मला याबाबत मला फार आनंद वाटतोय.

हेही वाचा    –      ..तर लाडकी बहीण योजना बंद करण्याचे आदेश देऊ; सर्वोच्च न्यायालयाने सरकारला सुनावले

नीलम गोऱ्हे यांची राजकीय कारकीर्द

महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याकरता नीलम गोऱ्हे यांनी १९७७ साली युवक क्रांती दलातून सामाजिक क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. परंतु, त्यांनी त्यांची चौकट केवळ महिला चळवळीपुरती मर्यादित ठेवली नाही. ऊसतोडणी कामगार, शोषित, मजूर, भूमीहीन दलित, मजुरांसाठीही त्यांनी चळवळ उभारली. ज्या काळात राजकारणात पुरुषी वातावरण होतं, त्या काळात नीलम गोऱ्हे यांनी आपली राजकीय कारकिर्द जोरात सुरू केली. त्यांनी लक्ष वेधलेल्या महिलांच्या प्रश्नांमुळे राजकारणाच्या पटलावर नवा अजेंडा निर्माण होत होता. महिलांचे प्रश्न सोडवण्याकरता समाजकारणासह राजकारणही गरजेचं असल्याचं त्यांना कळलं, म्हणून त्यांनी आपली राजकीय वाटचालही सुरू केली. महिलांचे प्रश्न, दलितांच्या समस्या सोडवण्याकरता त्यांनी १९८७ साली रिपब्लिकन पक्षाला पाठिंबा दिला. राज्याच्या राजकारणात नीलम गोऱ्हेंचा झंझावात वाढत गेला. प्रखर महत्त्वाकांक्षा असलेलं निडर व्यक्तिमत्त्व नीलम गोऱ्हेंच्या रुपाने मिळत होतं. त्यातूनच, त्यांनी पुढे शिवसेनेची वाट निवडली.

बाळासाहेब ठाकरेंच्या काळातील शिवसेना अशीच निडर आणि आक्रमक होती. त्यामुळे नीलम गोऱ्हेंच्या स्वभावाशी शिवसेनेचा स्वभाव जुळला. यातून नीलम गोऱ्हेंचं पक्षातील वर्चस्व वाढत गेलं. शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी महिलांचे अनेक प्रश्न मांडले. शिवसेनेतील महिला आघाडी गोऱ्हेंनी मजबूत केली. गोऱ्हेंच्या कामाचा झंझावात पाहून त्यांना विधान परिषदेत पाठवण्यात आलं. २००२ साली त्या विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आल्या. २००२ पासून विधान परिषदेच्या आमदार राहिलेल्या नीलम गोऱ्हे यांना २०१९ साली उपसभापती पदाची जबाबदारी मिळाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button