breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

लाडकी बहीण योजनेच्या अर्जातील चुक दुरुस्तीची महिलांना मिळणार एकच संधी…

पिंपरी : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांची महापालिकेच्या केंद्रांवर गर्दी होत असून, आतापर्यंत शहरात १ लाख ४१ हजार महिलांचे अर्ज भरून झाले आहेत, या अर्जाची पडताळणी करताना काही अर्जामध्ये त्रुटी आढळल्या आहेत. महिलांना अर्जातील त्रुटी दूर करण्याची एक संधी मिळणार असून, त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. ही दुरुस्ती त्वरित करून घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड शहरातील पात्र महिलांनी अर्ज करण्यासाठी महापालिकेच्या सेतू केंद्रावर मोठी गर्दी केली होती. यावेळी अर्ज करताना महिलांना सर्व्हर डाउन, इंटरनेट डाउन, आवश्यक असलेल्या कागदपत्रांचा अभाव अशा विविध समस्यांना सामोरे जावे लागले.

हेही वाचा   – ‘मी जेव्हा संसदेत सरकारविरोधात बोलते तेव्हा माझ्या पतीच्या विरोधात नोटीस निघते’; सुप्रिया सुळेंचा आरोप 

३१ ऑगस्टपर्यंत लाडकी बहीण योजनेत अर्ज करण्यासाठी महिलांना संधी आहे. त्यामुळे दररोज शेकडो महिला ऑफलाइन, ऑनलाइन अर्ज करीत आहेत.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी मोबाइलवर सुद्धा अर्ज करता येतो. यासोबतच शहरातील सेतू, कैफे सेंटरवरही प्रशासनाने मोफत अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

शहरातून ऑनलाइन, ऑफलाइनद्वारे काही लाखांवर अर्ज आले असून, या अर्जाची पडताळणी करण्यात येत आहे. त्यानुसार त्रुटी काढण्यात आल्यानंतर संबंधित महिलांच्या मोबाइलवर संदेश पाठविण्यात येत आहे: परंतु, या महिलांना अर्ज करण्याची आणखी एक संधी मिळणार आहे.

तानाजी नरके, सहायक आयुक्त, महापालिका

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button