breaking-newsताज्या घडामोडीपुणे

‘मुलींचे मोफत शिक्षण’बाबत टाळाटाळ केल्यास शैक्षणिक संस्थांची मान्यता रद्द केली जाणार’; मंत्री चंदक्रांत पाटील

पुणे : मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय राज्‍य सरकारने घेतला आहे. त्‍यामुळे एखाद्या मुलीस मोफत शिक्षण देण्यास महाविद्यालय टाळाटाळ करीत असल्‍यास त्‍यासाठी हेल्‍पलाइन क्रमांक आजपासून उपलब्ध करून दिला जाणार आहे.त्‍यावर विद्यार्थिनींनी तक्रार केल्‍यास २४ तासांत संबंधित महाविद्यालयांना नोटीस पाठवून कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंदक्रांत पाटील यांनी दिली.

चंद्रकांत पाटील यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये आर्थिकदृष्ट्या मागास, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास, इतर मागासवर्ग या प्रवर्गांतील मुलींना मोफत शिक्षण देण्याच्या तरतुदीची सविस्‍तर माहिती विशद केली. त्‍याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे, तरीही महाविद्यालयाकडून या निर्णयाच्या पालनाबाबत टाळाटाळ केली जात आहे.त्‍या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुलींना मोफत शिक्षणाच्या निर्णयाचे पालन न करणाऱ्या महाविद्यालयांच्या शैक्षणिक संस्थांची मान्यता रद्द केली जाणार असल्‍याचे सांगितले.

हेही वाचा     –      शहर राष्ट्रवादी काँग्रेस बचतगट महासंघ सेलची जम्बो कार्यकारिणी जाहीर

मोफत शिक्षणासंबंधी मुलींच्या अडचणी कळाव्यात म्हणून हेल्‍पलाइन क्रमांक क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. या क्रमांकावर एकाच वेळी हजारो विद्यार्थिनी तक्रार नोंदवू शकतील. तक्रार आल्‍यानंतर उच्च शिक्षण विभागातील अधिकारी संबंधित महाविद्यालयात जाऊन खातरजमा करतील. त्‍यानंतर मुलींना मोफत प्रवेश देण्याचे निर्देश दिले जातील. एवढे करूनही प्रवेश दिला जात नसेल, अशा महाविद्यालयांवर तत्‍काळ कारवाई करण्यात येणार असल्‍याचे पाटील म्‍हणाले.

राज्‍य शासनाने मुलींना व्‍यावसायिक शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्‍याची अंमलबजावणी करण्यासाठी गावपातळीवर विशेषत: महिला सरपंचांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.गावातील एखाद्या मुलीस संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य मोफत शिक्षणातून प्रवेश देत नसतील, त्‍या महाविद्यालयातील प्राचार्यांना भेटा. हेल्‍पलाइन क्रमांकाची सुविधा घ्या आणि गावातील मुलींच्या मोफत शिक्षणासाठी आग्रही राहा, असा सल्‍ला चंद्रकांत पाटील यांनी दिला.

मुलींना मोफत शिक्षण देण्याची कार्यवाही शिक्षण संस्‍थांकडून सुरू आहे. शिक्षण संस्‍थांना या शुल्‍काची प्रतिपूर्ती सप्‍टेंबर – ऑक्‍टोबर महिन्‍यात केली जाणार आहे.त्‍या कालावधीत मुलींच्‍या मोफत प्रवेशावरून महाविद्यालय अथवा संस्‍थांना आर्थिक अडचणी येत असतील, त्‍यांच्‍यासाठी राज्‍य शासनाने नवी योजना सुरू केली आहे. अशा महाविद्यालयांना कोणत्‍याही बँकेतून तीन- चार महिन्‍यांसाठी विनातारण कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.त्‍यामुळे संस्‍थांनी कोणत्‍याही मुलीची मोफत शिक्षणासाठी अडवणूक करू नये, असे सक्‍त आदेशही पाटील यांनी दिले आहेत.

हेल्‍पलाइन क्रमांक

07969134440

07969134441

वेबसाईट लिंक : https://helpdesk.maharashtracet.org

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button