कपील शर्माच्या चाहत्यांसाठी खूशखबर, लवकरच ‘या’ शो व्दारे करणार पुर्नागमन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/kapil-sharma-6.jpg)
नवी दिल्ली – हिंदी टेलिव्हिजनवरील ‘काॅमेडियन किंग’ अशी अोळख असणारा ‘कपिल शर्मा’ अखेर आपल्या चाहत्यांसाठी एक खुशखबर घेऊन येत आहे. कपिल लवकरच टेलिव्हिजनवर पहिल्यासारख काॅमेडी करत लोकांना हसविताना दिसणार आहे. कपिल शर्मा याने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्विट करत ही माहिती दिली आहे.
मागील काही महिन्यांपासून कपिल शर्मा हा मानसिकरित्या ठिक नसल्याने टेलिव्हिजनपासून दूर होता, मात्र आता त्याने टेलिव्हिजनवर पुर्नागमन करत असल्याचे सांगितले आहे.
कपिल याने ट्विट करताना म्हटले आहे की, ‘लवकरच परत येत आहे. ‘द कपिल शर्मा शो’ घेऊन तुमच्यासाठी. ‘फक्त सोनी टीव्ही वर”.
या ट्विटला अनेक चाहत्यासोबत बी-टाऊनमधील अनेक सेलिब्रिटीनी सुध्दा त्याचे पुर्नागमन होत असल्याने आनंद व्यक्त केला आहे.आणि त्याच्या ट्विटला रिप्लाय केला आहे. प्रसिध्द निर्माती एकता कपूर हिने ‘सूपर’ असे लिहून कपीलला रिप्लाय दिला आहे.
त्याच्या शो मध्ये लल्लीची भूमिका करणारी प्रसिध्द भारती सिंह हिने ‘लवकर ये’ असे म्हटले आहे.