breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेश

Wayanad Landslide | भूस्खलनामुळे झालेल्या दुर्घटनेतल्या बळींची संख्या १४८, मदत आणि बचावकार्य सुरु

Wayanad Landslide | केरळच्या वायनाड जिल्ह्यातील मेप्पाडीमध्ये झालेल्या भूस्खलनाच्या दुर्घटनेत १४८ जणांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही शकडो लोक बेपत्ता असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. सध्या एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाकडून मदतकार्य सुरू आहे. मात्र, खराब हवामान आणि पावसामुळे बचावकार्यात अडचणी निर्माण होत आहेत.

वायनाड जिल्ह्यात झालेल्या या भूस्खलनाच्या घटनेचा ४ पेक्षा जास्त गावांना फटका बसला आहे. मदतीसाठी 200 पेक्षा जास्तत लष्कराचे जवान मदतीसाठी तैनात करण्यात आले आहेत. मदतकार्यात पावसामुळे अडथळा येत असल्याने रात्री सर्च ऑपरेशन थांबवण्यात आलं होतं. मात्र, पुन्हा सकाळी मदतकार्य सुरू करण्यात आलं आहे.

हेही वाचा     –      ‘यावेळी काही ना काही मोठा भूकंप होईल’; ठाकरे गटातील नेत्याचं विधान 

केरळ सरकारने वायनाडमधील भूस्खलनाच्या दुर्घटनेनंतर दोन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. तसेच हवाई दलाची दोन हेलिकॉप्टर्स मदतीसाठी पाठवण्यात आली असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

वायनाड भूस्खलनाच्या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख आणि जखमींना ५० हजारांची मदत देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. तसेच, केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदतीचे आश्वासनही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button