breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

कारगिल विजय दिवस : जाणून घ्या कारगिल युद्धासंदर्भात महत्त्वाचे मुद्दे..

Kargil Vijay Diwas | १९९९ च्या मे महिन्यात मध्ये कारगिल सीमेजवळ घुसखोरी झाल्याची माहिती भारताला मिळाली. त्यानंतर भारताने ऑपरेशन विजय या कारवाईला सुरुवात केली. कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी दरवर्षी २६ जुलै रोजी कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो.

कारगिल युद्धासंदर्भात महत्त्वाचे मुद्दे :

कारगिल युद्ध भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये १९९९ साली झाले होते. कारगिल सेक्टरमध्ये आलेल्या घुसखोरांना सीमेपार करण्यासाठी हे युद्ध झाले होते. हे युद्ध प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ १९९९ साली मे ते जूलै या महिन्यांमध्ये झाले.

हेही वाचा     –    राष्ट्रपती यांच्या दौऱ्याच्याअनुषंगाने वाहतूक बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

दहशतवादी आणि पाकिस्तानी सैन्य यांना शोधून काढण्यासाठी प्रथमच हवाई दलाचा वापर करण्यात आला. कारगिल युद्ध हे समुद्रसपाटीपासून अत्यंत उंच प्रदेशात लढले गेल्याने असे युद्ध लढण्यासाठी अत्यंत अवघड समजले जाते.

ऑपरेशन विजय यशस्वी झाल्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी १४ जुलै रोजी जाहीर केले. २६ जुलै रोजी ऑपरेशन विजय अधिकृतरित्या संपल्याचे जाहीर करण्यात आले. या युद्धात भारताच्या ५०० लोकांना हौतात्म्य आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button