Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

राष्ट्रपती यांच्या दौऱ्याच्याअनुषंगाने वाहतूक बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नियोजित पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासोबतच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी २८ जुलै रोजी मध्यरात्रीपासून ते २९ जुलै दुपारी ४ वाजेपर्यंत मौजे नांदेगांव-सनीजवर्ल्ड व सुसमार्गे पुणे मार्गावरील सर्व प्रकारची हलकी, जड़, अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जारी केले आहेत.

हेही  वाचा    –    उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा घेतला आढावा

मौजे नांदेगांव- सनीजवर्ल्ड व सुस मार्गे पुणे मार्गावरील सर्व प्रकारची हलकी, जड अवजड वाहनांची वाहतुक बंद करुन ती नांदेगांव-माले येथून हिंजवडी मार्गे पुणे तसेच नांदेगांव-पिरंगुट-चांदणी चौक मार्गे पुणे या पर्यायी मार्गावरुन वळविण्यात आली येतील. नागरिकांनी या पर्यायी मार्गाचा वापर करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. दिवसे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button