breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडराजकारणसंपादकीयसंपादकीय विभाग

Ground Report । शिवसेनेच्या सुलभा उबाळे ‘चेकमेट’ : आमदार लांडगे समर्थकांनी दाखवली ‘‘काम बोलता है’’ म्हणत ‘ही’ १० कामे!

‘महाईन्यूज’च्या वृत्तामुळे उडाली खळबळ; उबाळे- लांडगे समर्थकांत ‘सोशल वॉर’

‘चाणक्य’ सल्लागाराच्या आततायीपणामुळे सुलभा उबाळेंचा प्रचार भरकटला?

पिंपरी । विशेष प्रतिनिधी
भोसरी विधानसभा मतदार संघातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारे विश्लेषन ‘महाईन्यूज’मध्ये ‘‘विरोधकांना काम ना धाम… निवडणुकीपुरता रामराम’’ अशा मथळ्याखाली प्रसिद्ध केले होते. त्याचा आधार घेत शिवसेना ठाकरे गटाच्या सुलभा उबाळे आणि पदाधिकाऱ्यांनी ‘‘भोसरीच्या आमदारांनी ठोस काम दाखवावे’’ असे खुले आव्हान ‘सोशल मीडिया’वर दिले

एखाद्या वस्तुस्थितीदर्शक वृत्ताची दखल घेत त्यावर तात्काळ ‘रिॲक्ट’ झाल्याबद्दल सुलभा उबाळे आणि समर्थकांचे निश्चितच कौतूक व्हायला हवे आहे. मूळात ‘निवडणुकीच्या निमित्ताने विकासाच्या आणि रास्त मुद्यांवर’ सांगोपांग चर्चा व्हावी, अशीच पिंपरी-चिंचवडकरांची अपेक्षा आहे.

सुलभा उबाळे काय म्हणाल्या आहेत?

‘‘भोसरी विधानसभेच्या विद्यमान आमदारांनी गेल्या दहा वर्षात काय कामे केले असा प्रश्न विरोधकांनी विचारल्याने केवळ ‘दाम पे चर्चा’ करणाऱ्या भोसरीच्या आमदारांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळे विरोधकांना ‘काम ना धाम’ असे म्हणणाऱ्यांनी आमदारांचे एक ठोस काम दाखवावे असे प्रत्युत्तर आता भोसरी विधानसभेतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले आहे.’’असे वृत्त शहरातील आघाडीच्या वृत्तवाहिनीवर प्रसिद्ध झाले आहे. 2014 ते 2024 या दहा वर्षातील कालावधीत आमदार साहेब आपण केलेले एक ठोस काम दाखवा असे आव्हानच आता भोसरी विधानसभेतील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आमदार महेश लांडगे यांना दिले आहे. गल्लीबोळातील कामे करायला रस्ते, फुटपाथ करायला नगरसेवक, पालिका प्रशासन सक्षम आहे. तिथे कुदळ आणि फावडा घेऊन आपण जाता. कामाचे क्रेडिट घेता असे देखील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.नदी सुधार, नियमित, व्यवस्थित पाणी पुरवठा, कचरा, उद्योगधंदे, शिक्षण, रोजगार यावर आमदारांनी काम करायला हवे होते असे देखील शिवसेनेने म्हटले आहे.

लांडगे समर्थकांनी दाखवली १० कामे…

उबाळे आणि समर्थकांच्या आक्षेपावर आमदार महेश लांडगे समर्थकांनी सोशल मीडियावर रान पेटवले.एक ठोस काम दाखवा म्हणणाऱ्या उबाळे यांना लांडगे समर्थकांनी ‘‘काम बोलता है’’ असे ब्रँडिंग करीत थेट पिंपरी-चिंचवड शहर आणि पिंपरी-चिंचवडकरांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित १० प्रमुख विकासकामे मार्गी लावल्याचे जाहीर करुन टाकले. त्यामध्ये म्हटले आहे की, ‘‘काय केले अन्‌ काम दाखवा म्हणणाऱ्यांनो… उघडा डोळे बघा नीट! : 1. शास्तीकर सरसकट संपूर्ण माफ झाला. 2. आंद्रा भामा आसखेड प्रकल्पाचे पाणी शहरात दाखल झाले. 3. महाराष्ट्रातील पहिले संत तुकाराम महाराज संतपीठ सुरू झाले. 4. मोशी कचरा डेपोवरील बफर झोन 100 मीटपर्यंत कमी झाला. 5. वेस्ट टू एनर्जी : कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प सुरू झाला. 6. नवनगर प्राधिकरण बाधितांचा साडेबाराटक्के परतावा प्रश्न सुटला. 7. पुणे- पिंपरी-चिंचवड मेट्रो : पिंपरी, निगडीपर्यंत मेट्रोला गती मिळाली. 8. पिंपरी-चिंचवडला स्वतंत्र पोलीस आयुक्तालय मिळाले. 9. पिंपरी-चिंचवड न्यायालय उभारणीचे काम सुरू झाले. 10. मोशी येथे पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल होत आहे. अशा १० कामांचा उल्लेख करीत आमदार महेश लांडगे यांना काम दाखवा म्हणणाऱ्यांनी आता आत्मचिंतन करावे..! असा सल्लाही दिला आहे. विशेष म्हणजे, “मंजिल उन्हीं को मिलती है, जिनके सपनों में जान है।’’ असा दावा करीत आमदार लांडगे समर्थकांनी शिवसेनेच्या सुलभा उबाळे आणि समर्थकांच्या आव्हानातील हवा काढून घेतली आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button