breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

ठाकरेंनी विधानसभेसाठी शिवसंपर्क मोहीम लक्ष्य 2024’ची केली आखणी

मुंबई : लोकसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात यश आले. यानंतर आता सगळ्या पक्षांनी आपला मोर्चा विधानसभेकडे वळवला आहे. आज उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. उद्धव ठाकरे यांनी विधानसभा संपर्कप्रमुखांना नवी मोहीम दिली आहे. शिवसंपर्क मोहिम लक्ष्य 2024 असं या मोहिमेचे नाव आहे. यावेळी विविध कामे करण्याचे आदेश ठाकरेंनी दिले आहेत.

उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणीदेखील सुरू केली आहे. संपर्कप्रमुखांकडून उच्छुक उमेदवारांची नावे मागवली आहेत. त्यदृष्टीने लवकरच विधानसभा मतदारसंघ निहाय बैठका घेऊन इच्छुक उमेदवारांसंदर्भात जिल्हाप्रमुख, संपर्क प्रमुख आदी पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. तसेच उद्धव ठाकरे यांनी लोकसभा 2024 च्या निवडणुकीत मविआ उमेदवाराला मिळालेल्या आघाडीची कारणे आणि आघाडी जिथे मिळाली नाही त्याबाबतची कारणे मागितली आहेत. त्याचसोबत आपल्या विभागतील सर्वपक्षीय जिल्हापरिषदेतील, नगरसेवकांची, पंचायत समितीतील सदस्य संख्या,प्रत्येक मतदार संघातील जाती निहाय मतदार संख्या याची माहिती विधानसभा संपर्कप्रमुखांकडून मागितली आहे.

हेही वाचा –  अजितदादांच्या वाढदिवसाच्या केकची राजकीय वर्तुळात चर्चा

या मोहिमेअंतर्गत विधानसभा संपर्कप्रमुखांनी काय काम करावे?

  1. सर्व विधानसभा संपर्कप्रमुखांनी हा दौरा करणे आवश्यक. सोबत संबंधित उपजिल्हाप्रमुख व तालुकाप्रमुख असणे आवश्यक आहे.
  2. सदर मोहिमेअंतर्गत प्रत्येक पंचायत समिती गणामध्ये बैठक आयोजित करणे आवश्यक आहे.
  3. बैठकीसाठी स्थानिक विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख (पुरुष-महिला), युवासेना शाखा युवा अधिकारी आदी पदाधिकारी अपेक्षित आहेत.

सदर मोहिमेअंतर्गत ‘ही’ माहिती आवश्यक

  1. गावातील शाखाप्रमुख, शाखासंघटक, युवासेना शाखा युवा अधिकारी इत्यादींची नावे व दूरध्वनी
  2. गावात किती शिवसैनिकांची नोंदणी झाली आहे
  3. नवीन मतदारांची नोंदणी किती झाली.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button