ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी

शाळेच्या प्रांगणात ज्ञानोबा माऊलींच्या गजरात विलोभनीय दिंडी सोहळा

पिंपरीः विठुनामाची भरली शाळा || प्रसन्न झाला विठू सावळा || विठुराया आणि आषाढीचे महत्व सगळ्या विद्यार्थ्यांना समजावे या उद्देशाने चॅलेंजर पब्लिक स्कूल, पिंपळे सौदागर येथे १६ जुलै २०२४ रोजी आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. शाळेच्या प्रांगणात ज्ञानोबा माऊलींच्या गजरात विलोभनीय दिंडी सोहळा साजरा करण्यात आला. विठ्ठल-रखुमाई, वारकऱ्यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी हाती टाळ घेत विठ्ठलनामाचा जयघोष करत शिवमंदिरापर्यंत दिंडी काढली. हातातील टाळ-चिपळ्यांचा गजर, मुखी विठ्ठलनाम यामुळे वातावरण चैतन्यमय झाल्याचे पहायला मिळाले.

Pimple, Saudagar, Challenger, Public, School, Ashadhi, Ekadashi, Enthusiasm, Sajari, Gyanoba, Mauli, Dindi, Ceremony,
Pimple, Saudagar, Challenger, Public, School, Ashadhi, Ekadashi, Enthusiasm, Sajari, Gyanoba, Mauli, Dindi, Ceremony,

विठ्ठल-रखुमाईच्या विधिवत पूजनानंतर विद्यार्थ्यांनी अभंग सादर केले. इयत्ता चौथीमधील विद्यार्थी वेद सावंतने ‘केशवा माधवा’ हा अभंग हार्मोनियम वाजवून सादर केला. पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी तुकाराम महाराजांवर नाटक सादर केले. या कार्यक्रमाला शाळेच्या उपाध्यक्षा अनिताताई काटे तसेच निहारा काटे आणि लीना काटे उपस्थित होत्या.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, पालखीपूजन व विठ्ठलाची आरती झाली. अनिताताई काटे यांनी विद्यार्थ्यांना आषाढीचे महत्व सांगून मार्गदर्शन केले.

Pimple, Saudagar, Challenger, Public, School, Ashadhi, Ekadashi, Enthusiasm, Sajari, Gyanoba, Mauli, Dindi, Ceremony,
Pimple, Saudagar, Challenger, Public, School, Ashadhi, Ekadashi, Enthusiasm, Sajari, Gyanoba, Mauli, Dindi, Ceremony,

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेची विद्यार्थिनी शाकंभरी पाटीलने केले. सोहळ्यासाठी अभिलाषा सोनार तसेच इतर सर्व शिक्षक सहकारी यांनी परिश्रम घेतले. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सुविधा महाले यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button