पुणे विमानतळाचे नवे टर्मिनल प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/www.mahaenews.com-59-1-780x470.jpg)
पुणे : पुणेकरांना प्रतीक्षा असलेले पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नवे टर्मिनल प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. येत्या रविवारपासून म्हणजेच 14 जुलैला या नव्या टर्मिनलचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
केंद्रीय केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या टर्मिनलची प्रत्यक्ष पाहणी करत सज्जतेचा आढावा घेतला. उपलब्ध असलेल्या सर्व सेवा-सुविधांची मोहोळ यांनी बारकाईने माहिती घेतली. पुण्याचे खासदार असलेले मुरलीधर मोहोळ यांनी हे टर्मिनल सुरु करण्यासाठी पाठपुरावा केला होता.
हेही वाचा – कामगार रुग्ण व कुटुंबियांसाठी रेफरल नोट पुन्हा सुरू करा अन्यथा टाळे ठोकू..!
सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या सीआयएसएफ जवानांच्या उपलब्धतेसह विविध तांत्रिक प्रक्रिया मोहोळ यांनी स्वतः लक्ष घालून पूर्ण केल्या. टर्मिनल सुरु करण्याची सर्व प्रक्रिया आता जवळपास संपली असून येत्या रविवारी दुपारी 1 वाजल्यापासून हे टर्मिनल पुणेकरांसाठी सुरु होणार आहे.
नव्या टर्मिनलमधून वर्षाला 90 लाख प्रवाशांना ये-जा करता येणार आहे. अत्याधुनिक व सुसज्ज व्यवस्था असणाऱ्या या नव्या टर्मिनलला 6 बोर्डिंग गेट आहेत. एकाचवेळी 1500 ते 1800 प्रवाशांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अत्याधुनिक सोई-सुविधांसह पुण्याच्या संस्कृतीची छाप या टर्मिनलवर पाहायला मिळणार आहे.