आरोग्यताज्या घडामोडीमुंबई

ठाण्यात स्वाईन फ्ल्यूचे तब्बल 70 रुग्ण, आरोग्य विभागाची चिंता वाढली

स्वाईन फ्ल्यूमुळे अनेक जण दगावल्याची माहिती समोर

ठाणे : ठाण्यात स्वाईन फ्ल्यू (एचवनएनवन) तब्बल 70 रुग्ण आढळल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. गेल्यावर्षी संपूर्ण पावसाळ्यात 87 रुग्ण सापडले होते. मात्र यावर्षी केवळ जून महिन्यातच रुग्णांची संख्या वाढली आहे. महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी स्वाईन फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांसाठी स्वतंत्र आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आल्याची माहिती ठाणे पालिकेचे माहिती जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांनी दिली आहे.

विशेष म्हणजे 2009 मध्ये हा आजार समोर आला तेव्हा जगभरात एकच खळबळ उडाली होती. भारतातही अनेकांना या आजाराची लागण झाली होती. या आजारामुळे अनेक जण दगावल्याची माहिती समोर आली होती. पण या आजारावर योग्यप्रकारे उपचार घेतला तर माणूस बरादेखील होतो. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. दरम्यान, जगभरात लाखो रुग्णांनी या आजारावर मात केली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाण्याची गरज नाही. त्यापेक्षा काळजी घेणं गरजेचं आहे. याशिवाय मास्करचा वापर करावा आणि खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल ठेवावा. आपले हात वारंवार स्वच्छ पाण्याने धुवावे, असे अनेक उपाय या आजारावर आहेत.

स्वाईन फ्लू आजार नेमका कसा होतो?
स्वाईन फ्ल्यू हा एक संसर्गजन्य आजार असून H1N1 व्हायरसमुळे त्याची लागण होते. 2009 साली WHO ने हा रोग संसर्गजन्य असल्याचे जाहीर केले होते. हा आजार केवळ माणसांमुळे नव्हे तर प्राण्यांमुळे देखील होतो. ज्या व्यक्तीला स्वाईन फ्ल्यूची लागण झाली असेल तो शिंकला अथवा खोकला, तर त्यातून या आजाराचे विषाणू हवेत पसरतात. याचे विषाणू हवेत 8 तासांपर्यंत जिवंत राहू शकतात. या विषाणूंचा निरोगी अथवा स्वस्थ व्यक्तीचे डोळे, नाक, तोंड अथवा त्वचेशी संपर्क आला, तर विषाणूंचे संक्रमण होऊन त्या व्यक्तीलाही स्वाईन फ्ल्यूची लागण होते.

स्वाईन फ्ल्यू आजाराची लक्षणे काय?
ताप येणे, हुडहुडी भरणे वा थंड वाजणे, सर्दी होऊन नाक वाहते राहणे, खोकला, घशात खवखव किंवा दुखणे, अंगदुखी तसेच डोके दुखणे, पोटात दुखणे, मळमळ किंवा उलटी होणे, यासाखी लक्षणे स्वाईन फ्लूमध्ये दिसू शकतात. विशेष म्हणजे 65 वर्षांवरील नागरिक, लहान मुले, गर्भवती महिला, तसेच मधुमेह , किडनीचे विकार असे आजार असणाऱ्यांना स्वाईन फ्ल्यूची लागण होण्याचा धोका सर्वाधिक असतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button