ऋषभ पंतचा कसोटीत अनोखा पराक्रम
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/ris.jpg)
भारत विरुद्ध विंडीज पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय फलंदाजांनी दमदार फलंदाजी करत वेस्ट विंडीजच्या गोलंदाजाची चांगलीच धुलाई केली आहे. पहिल्या दिवशी पृथ्वी शॉने पदार्पनातच दमदार शतक ठोकल्यानंतर दुसऱ्या दिवशी कर्णधार विराट कोहलीपाठोपाठ रिषभ पंतनेही नाबाद अर्धशतक केले. मात्र, मोटा फटका मारण्याच्या नादात पंत 92 धावांवर बाद झाला आणि त्याला शतकाने हुलकावणी दिली.
पंतने 84 चेंडूंत 92 धावा केल्या. यात त्याच्या 8 चौकार आणि तब्बल 4 षटकारांचा समावेश आहे. पंतने या दमदार खेळीबरोबरच एक खास पराक्रम केला आहे. त्याने कसोटीत पहिली धाव षटकार मारून घेतली होती. त्यानंतर त्याने आपले पहिले कसोटी शतकही षटकार मारूनच पूर्ण केले होते. तसेच त्याने आज आपले पहिले अर्धशतकही षटकार मारूनच पूर्ण केले.
पंतने आज आपल्या आंतराष्ट्रीय कारकीर्दीतील चौथा सामना खेळला आहे. पंतने आजपर्यंत 10 षटकार खेचले आहेत. आज त्याची चौथ्याच सामन्यात कसोटीतील दुसरे शतक करण्याची संधी थोडक्यात हुकली. मात्र, त्याच्या खेळीचे चाहत्यांकडून कौतुक होत आहे. याआधिही पंतने असाच पराक्रम भारत विरुध्द इंग्लंडमधील कसोटी दरम्यान केला आहे. त्याने इंग्लंडविरुध्दच्या शेवटच्या सामन्यात शतक केले होते. हे शतक करताना रिषभने एक खास विक्रमही रचला आहे. त्याने हे शतक कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात केले होते. त्यामुळे तो कसोटी सामन्याच्या चौथ्या डावात शतक करणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक ठरला होता.