गट क ची परीक्षा एमपीएससीतर्फे घेणार; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
![Devendra Fadnavis said that Group C examination will be conducted by MPSC](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/07/Devendra-Fadnavis-780x470.jpg)
मुंबई | राज्य सरकारच्या वतीनं गट कच्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राबवली जाणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. लोकांच्या मागणीनुसार हा निर्णय घेण्यात आला असून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने देखील याबाबत तयारी दर्शवली आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नोकरभरती परीक्षेंमधील गैरप्रकाराचं विषय गंभीर आहे. पण घडलं काय आणि नरेटीव्ह काय आहे? मागच्या सरकारच्या काळात किती आणि काय फुटलं याची जंत्री मी आणली आहे. मात्र त्यामध्ये मी जाणार नाही. पेपर फुटीच्या प्रकरणात आपण कारवाई केलेली आहे. केवळ एक गुन्हा दाखल झाला असून दुसरा कुठलाही गुन्हा आतापर्यंत दाखल झालेला नाही. आतापर्यंत ७५ हजारची रिक्त भरती घोषित केली होती. त्यापैकी सरकार आल्यांनतर ५७ हजार ४५२ जणांच्या नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच आता परीक्षा ह्या टीसीएसच्या केंद्रावर आणि आयबीपीएसतर्फे होतील.
हेही वाचा – पॅन कार्डच्या माध्यमातून होऊ शकते फसवणूक असा रोखा गैरप्रकार!
आमच्या सरकारने ७७ हजार ३०५ लोकांना नोकरी दिली आहे. त्यात कोणत्याही प्रकारचा घोटाळा झाला नाही. ७७ हजार पदे भरणे हा राज्य सरकारचा रेकॉर्ड आहे. यात सर्व विभाग आहेत. गट की च्या जागा टप्याटप्याने भरणार आहोत. सर्व विभागाची यादी माझ्याकडे आहे. टीसीएस आणि आयबीपीएस या दोन्ही संस्थांनी परीक्षा घेतल्या हायेत. पेपरफुटीबाबत जो एफआयआर झाला त्याबाबत मी बोललो आहे. कुठलीही गोष्ट लपवण्याची कारण नाही. सरकारने पारदर्शी प्राके काम केले आहे. एखाद्या ठिकाणी गडबड करण्याचा प्रयत्न झाला तो आम्ही हाणून पाडला आहे. पेपर फुटीबाबत केंद्र सरकारने जो कायदा केला आहे त्यावर राज्य सरकारनेदेखील कायदा करण्याचा मागण्या अधिवेशनात केला आहे. या अधिवेशनात पेपरफुटीविरोधात कायदा करणार आहोत, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.