‘मोदींना राहुल गांधींना राम-राम करावा लागेल’; संजय राऊतांचं विधान
मुंबई | गेल्या दहा वर्षांत नरेंद्र मोदी यांच्या अटी, शर्तीवर लोकसभा चाललली. परंतु आता विरोधी पक्ष मजबूत आहे. आता राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाले आहेत. त्यांना रामराम करुन नरेंद्र मोदी यांना लोकसभेत यावे लागणार आहे. सभागृहातून नरेंद्र मोदी यांना पळ काढता येणार नाही, असं शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) चे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी शपथविधी दरम्यान जय पॅलेस्टाईन..अशी घोषणा दिली. यावरून संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. पॅलेस्टाईनबाबत सरकारची भूमिका काय आहे. सरकारने आपले धोरण स्पष्ट करावे. पॅलेस्टाईन हा देश आहे. पॅलेस्टाईनमध्ये आजही ज्या पद्धतीने संहार सुरु आहे, त्याकडे लक्ष वेधले गेले होते. पॅलेस्टाईनचा उल्लेख करणे गुन्हा आहे का? असा सवाल संजय राऊतांनी यावेळी उपस्थित केला.
हेही वाचा – संत तुकाराम महाराजांचे दहावे वंशज संभाजी महाराज देहूकर यांचे निधन
आदीच्या लोकसभेत एकाच वेळी ७५-८० खासदारांना निलंबित करून लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या ओम बिर्ला यांना त्या पदावर मोदी बसवत आहेत. प्रोटेम स्पीकर पदासाठी सर्वात ज्येष्ठ असलेले के सुरेश यांना डावलून कमी वेळा खासदार असलेल्या व्यक्तीला बसवले. त्यामुळे ज्यांना आम्ही आमची ताकद दाखवून देत आहोत, असंही संजय राऊत म्हणाले.