पंकजाताई, भुजबळ साहेब आम्हाला आरक्षण मिळू द्या..; भावनिक चिठ्ठी लिहून तरुणाची आत्महत्या
![Maratha Reservation Activist Prasad Dethe Ends His Life In Pune](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/Maratha-Reservation-780x470.jpg)
पुणे | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील वातावरण चांगलच तापलं आहे. यातच बार्शीतल्या तरूणाने मराठा आरक्षणासाठी आयुष्य संपवलं आहे. एक भावनिक चिठ्ठी लिहून या तरुणाने आत्महत्या केली आहे. मूळचे बार्शीचे असणारे प्रसाद देठे हे पुण्यात एका खासगी कंपनीत काम करत होते.
सुसाईड नोटमध्ये नेमकं काय म्हटलं?
जयोस्तु मराठा..
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालेच पाहिजे. पंकजाताई, भुजबळ साहेब, हाके, शेंडगे, तायवाडे, टी.पी. मुंडे, गायकवाड आम्हाला आरक्षण मिळू द्या. विनंती आहे तुम्हाला. हात थरथरतोय म्हणून अक्षर असं आहे. माझ्या मृत्यूला कोणी जबाबदार नाही. मी स्वखुशीने मरत आहे.
हेही वाचा – पीएम शेतकरी सन्मान निधीचे २००० रुपये अद्याप आले नाहीत? तर अशाप्रकारे करा तक्रार?
जरांगे साहेब आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटू नका. विनंती आहे तुम्हाला. माझं तुम्हाला पटणार नाही, पण मी पूर्ण हताश झालोय. चिऊ मला माफ कर. लेकरांची काळजी घे. धीट रहा…मला माफ करा… तुमचाच प्रसाद, ही सुसाईड नोट लिहून प्रसाद देठे यांनी आयुष्य संपवलं आहे. या घटनेमुळे एकच हळहळ व्यक्त होते आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु झाल्यानंतर प्रसाद देठे हे सोशल मीडियावर सातत्याने सक्रिय होते. ते सोशल मीडियावर मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ सातत्याने पोस्ट टाकायचे. त्यांनी अनेकदा फेसबुक लाईव्ह करुन मराठा आरक्षणाची भूमिका हिरीरिने मांडली होती. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. जरांगे पाटील जिंदाबाद लाख मेले तरी चालतील लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे , आणि मराठा समाजाचा सध्याचा पोशिंदा फक्त आमचे जरांगे पाटील, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.