‘चिंचवडची जागा मीच लढणार’; अश्विनी जगताप ठाम
![Ashwini Jagtap said that I will contest the seat of Chinchwad](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/Ashwini-Jagtap-780x470.jpg)
पिंपरी | चिंचवड विधानसभा मतदारसंघ सध्या महायुतीत भाजपकडे आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी तिथे आमदार आहेत. पण याच जागेवर अश्वनी जगताप यांचे दीर आणि भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी दावा ठोकला आहे. यावर आज आमदार अश्विनी जगताप यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चिंचवड विधानसभा लढणार असल्याचं ठाम मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
अश्विनी जगताप म्हणाल्या, चिंचवड विधानसभेवर भाजपची ताकद आहे. महायुतीत चिंचवड विधानसभेची जागा भाजपला सुटते. दिवंगत लक्ष्मण जगताप हे चार वेळेस चिंचवड विधानसभेतून निवडून आलेले आहेत. तिथं आमची ताकद जास्त आहे.
हेही वाचा – Ground Report । पिंपरी-चिंचवडमध्ये महायुतीमध्ये ‘उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग’
शंकर जगताप यांच्याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. बोलण्याचं व्यक्तिस्वातंत्र्य आहे. विधानसभा लढवण्यावर मी ठाम आहे. पोटनिवडणुकीच्या वेळी कुठलीही चर्चा झाली नाही. उलट, परिवारातील प्रत्येकाने पोटनिवडणुकीत झोकून देऊन ३६ हजारांच्या मताधिक्याने निवडून दिले. लोकसभेपूर्वीच माझी विधानसभेची तयारी सुरू असून निवडणूक लढवण्यावर मी ठाम आहे, असंही त्या म्हणाल्या.