आमदार सुनील शेळके ॲक्शन मोडमध्ये!
आचारसंहिता संपली; तळेगाव दाभाडे शहरातील स्टेशन भागातील रस्ता डांबरीकरणाच्या कामास वेग
![MLA Sunil Shelke in action mode](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/Sunil-shelke-1-1-780x470.jpg)
तळेगाव दाभाडेः लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर तळेगाव दाभाडे शहरातील स्टेशन भागातील रस्ता डांबरीकरणाच्या कामास वेग आला आहे.आमदार सुनिल शेळके यांनी (मंगळवार ११) रोजी स्वराज नगरी, अल्टीनो कॉलनी,नाना भालेराव कॉलनी, वतन नगर, इंद्रायणी कॉलनी, रेनो कॉलनी परिसरातील कामे सुरु असलेल्या रस्त्यांची पाहणी केली. तसेच अधिकारी व ठेकेदार यांना कामे दर्जेदार करण्याच्या सूचना दिला व स्थानिक नागरिकांसोबत संवाद देखील साधला.यावेळी माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, माजी नगराध्यक्ष रवींद्र दाभाडे, ज्येष्ठ पत्रकार सुरेश साखवळकर, उद्योजक संग्राम जगताप,चेतन भेगडे व स्थानिक नागरिक उपस्थित होते.
स्टेशन भागातील नागरिकीकरण दिवसेंदिवस वाढत आहे.परंतु प्रशासनाकडून मुलभूत सुविधा पुरविण्यास दिरंगाई होत असते.या भागातील रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी सातत्याने नागरिकांकडून होत होती,याची दखल घेत आमदार शेळके यांनी रस्ता सुधारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध केला आणि मार्च महिन्यात भूमिपूजन देखील केले होते,परंतु लोकसभेची निवडणूक लागल्यानंतर तांत्रिक अडचणींमुळे कामे प्रत्यक्ष सुरू होण्यास काही कालावधी गेला.जूनच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर स्टेशन भागातील रस्त्याच्या डांबरीकरणास सुरुवात करण्यात आली आहे. पावसाळा सुरु होण्याच्या आधी रस्त्यांची कामे झाल्याने शालेय विद्यार्थी, महिला,जेष्ठ नागरिक यांनी आमदार शेळके यांचे आभार मानले.
‘नागरिकांकडून होत असलेल्या मागणीनुसार या सर्व रस्त्यांच्या कामासाठी निधी उपलब्ध करु शकलो व बहुतांश कामे पावसाळ्याआधी प्रत्यक्षात पूर्ण झाली याचे मला समाधान आहे.’
-आमदार सुनिल शेळके