सलग तीन दिवस ‘या’ राज्यांतील बँका राहणार बंद
डिजिटल बँकिंगचा वापर करू शकता
![Consecutive, three days, in states, banks, closures, digital, banking, usage,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/bank-780x470.jpg)
मुंबई : तुमचे बँकेमध्ये काही महत्वाचे आर्थिक व्यवहार किंवा कागदपत्रांचे काम असेल तर ते तात्काळ पूर्ण करून घ्या. कारण २३, २५ आणि २६ मे रोजी महाराष्ट्रासह अनेक राज्यांमधील बँका बंद राहणार आहेत. २३ मे रोजी बुद्ध पौर्णिमा, २५ मे रोजी नजरल जयंती तसेच लोकसभा निवडणूक आणि २६ मे रोजी रविवार असल्यामुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये बँका बंद राहणार आहे.
१४ राज्यांमध्ये बँका बंद राहणार
आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार २३ मे रोजी बौद्धपौर्णिमेनिमित्त त्रिपुरा, महाराष्ट्र, मिझोराम, मध्य प्रदेश, चंदीगड, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल,नवी दिल्ली, छत्तीसगड, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्ये बँका बंद राहणार आहेत.
डिजिटल बँकिंगचा वापर करू शकता
जरी बँका बंद राहणार असल्या तरी तुम्ही डिजिटल बँकिंग सेवांचा लाभ घेऊ शकणार आहात. कारण बँकेचे बरेचसे कामे हे नेट बँकिंग किंवा मोबाईलद्वारे करता येतात. त्यामुळे शक्य असल्यास त्याचा वापर करावा.