मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब ठाण्यात बजावला मतदानाचा अधिकार
घराच्या बाहेर निघून मतदान करा आणि लोकशाहीला बळकट करा; श्रीकांत शिंदेंचे मतदारांना आवाहन
ठाणेः निवडणुकीसाठी पाचव्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. देशभरात ४९ जागांवर मतदान होणार आहे. महाराष्ट्रात मतदानाचा पाचवा आणि शेवटचा टप्पा आज आहे. मुंबईतील सहा जागांसह राज्यातील १३ जागांवर मतदान होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथे मतदानाचा अधिकार बजावला. संपूर्ण कुटुंबासह पाचपाखाडी येथील मतदान केंद्रावर जाऊन मुख्यमंत्र्यांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडले. तर घराच्या बाहेर निघून मतदान करा आणि लोकशाहीला बळकट करा, असे आवाहन श्रीकांत शिंदें यांनी मतदारांना केले.
तर मतदार यादीमध्ये नाव नसल्याने नागरिकांनी मतदान केंद्रावरच गोंधळ घातला. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याण पश्चिम येथील मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रातील मतदान केंद्रावर नागरिकांनी गोंधळ घातला. तसेच नागरिकांनी या ठिकाणी ठिय्या आंदोलनदेखील केले.
कल्याण लोकसभेत चांगल्या प्रकारचे मतदान-श्रीकांत शिंदे
काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद झालेली असताना मात्र काही वेळातच ती सुरळीत सुरू आहे… यावेळी श्रीकांत शिंदे यांनी मतदारांना आव्हान केले. मोठ्या संख्येने घराच्या बाहेर निघून मतदान करा. कल्याण लोकसभेत चांगल्या प्रकारचे मतदान सकाळी 6 वाजेपासून लोक रांगेत उभे आहेत. नवीन मतदारांनाही आमचं आव्हान आहे की घराच्या बाहेर निघून मतदान करा आणि लोकशाहीला बळकट करा… चांगल्या पद्धतीने मतदान सुरू आहे… असं वक्तव्य श्रीकांत शिंदे यांनी केलं आहे.





