हॉकी स्पर्धा: मुंबई स्कूल स्पोर्टस् असोसिएशन संघाचा सनसनाटी विजय
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/hocky-1.jpg)
- तिसरी एसएनबीपी ऑल इंडिया हॉकी स्पर्धा
पुणे- मुंबई स्कूल स्पोर्टस् असोसिएशन संघाने गतवर्षीच्या उपविजेत्या शहीद बिषण सिंग स्कूल संघाचा सनसनाटी पराभव करून तिसऱ्या एसएनबीपी ऑल इंडिया हॉकी स्पर्धेचा आजचा दिवस गाजवला. सॅल्युट हॉकी ऍकॅडमी, मोहाली, हॉकी कुर्ग आणि हॉकी नाशिक या ंसगांनीही आपापले सामने जिंकताना आगेकूच केली.
श्री शिवछत्रपती स्पोर्टस् कॉम्प्लेक्स्, म्हाळूंगे-बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या क गटातील लढतीत मुंबईच्या मुंबई स्कूल स्पोर्टस् असोसिएशन (एमसीसीए) संघाने शहीद बिषण सिंग स्कूलचा 1-2 अशा पिछाडीवरून 4-3 असा पराभव करत आज सनसनाटी निकाल नोंदविला. एमसीसीएकडून धर्मेंद्र पाल व हृतिक गुप्ता यांनी प्रत्येकी एकेक आणि झैद खान याने दोन गोल केले. शहीद बिषण सिंग स्कूलकडून संता सिंग, लवजीत सिंग व मोहित यांनी एकेक गोल करताना कडवी झुंज दिली.
याशिवाय ड गटातील सामन्यात धैर्यशील जाधव याने केलेल्या पाच गोलच्या जोरावर क्रीडा प्रबोधिनी संघाने पश्चिम बंगालच्या बेलाकुलाई सीकेएसी संघाचा 8-0 असा सहज पराभव केला. तसेच ई गटातील लढतीत हॉकी सिंदेवाही संघाने यश ऍकॅडमी संघाचा 9-0 असा सहज पराभव करून आगेकूच केली. विजयी संघाकडून पवन नानेत याने एक, रौनक चौधरी आणि अल्ताफ खान यांनी प्रत्येकी दोन तर, महोम्मद अर्सलान कुरेशी याने तीन गोल केले.
सविस्तर निकाल-
गट क- मुंबई स्कूल स्पोर्टस् असोसिएशन (एमसीसीए)- 4 (धर्मेंद्र पाल 26वे मि., झैद खान 38 व 60वे मि., हृतिक गुप्ता 53वे मि.) वि.वि. शहीद बिषण सिंग स्कूल- 3 (संता सिंग 7वे मि., लवजीत सिंग 32वे मि., मोहित 66वे मि.); मध्यंतर- 1-2;
गट ई- हॉकी सिंदेवाही- 9 (पवन नानेत दुसरे मि., रौनक चौधरी 7 व 46वे मि., मोहम्मद अर्सलान कुरेशी 15, 17, 30 व 64वे मि., अल्ताफ खान 42 व 54वे मि.) वि.वि. यश ऍकॅडमी- 0; मध्यंतर- 5-0;
गट ज- सॅल्युट हॉकी ऍकॅडमी, मोहाली- 5 (राहुल 32, 35 व 53वे मि., नितीन 40 मि., भानू प्रताप सिंग 68 मि.) वि.वि. विवेकानंद स्कूल, जयपूर- 3 (रजत 44, 50 व 60वे मि.); मध्यंतर- 2-0;
गट ड- क्रीडा प्रबोधिनी- 8 (धैर्यशील जाधव 10, 16, 27, 33, 34 मि., आदित्य लालगे 41, 61, 64 मि.) वि.वि. बेलाकुलाई सीकेएसी, पश्चिम बंगाल- 0; मध्यंतर- 5-0;
गट ड- हॉकी कुर्ग- 7 (अर्जुन बी. 15वे मि., गॉथम एम. 21, 27, 61 व 69वे मि., गौरव सीएम 28वे मि., ध्रुविन डी. 48वे मि.) वि.वि. बेलाकुलाई सीकेएसी, पश्चिम बंगाल- 0; मध्यंतर- 4-0;
हॉकी नाशिक- 3 (मयूर अहिरे 20 व 40वे मि., कार्तिक लोखंडे 68वे मि.) वि.वि. प्रतापनगर ऍकॅडमी- 1 (रावी जोशी 26वे मि.); मध्यंतर- 1-1.