Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण
चौथ्या टप्प्यात ११ लोकसभा मतदारसंघात आज मतदान; ‘या’ नेत्यांमध्ये होणार स्पर्धा
![Voting today in 11 Lok Sabha constituencies in the fourth phase; There will be a competition between 'these' leaders](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/Loksabha-Election-2-780x470.jpg)
पुणे | महाराष्ट्रात चौथ्या टप्प्यात ११ जागांवर आज मतदान होत आहे. यामध्ये नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, बीड, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर आणि शिर्डी मतदार संघांचा समावेश आहे. चौथ्या टप्प्यात कुठे काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात, तर कुठे काँग्रेस आणि भाजपमध्ये, तर काही जागांवर शिवसेनेच्या दोन्ही गटातील उमेदवार आमनेसामने असणार आहेत.
या उमेदवारांमध्ये होणार लढत :
- नंदुरबार : हीना गावित विरुद्ध गोवळ पाडवी
- जळगाव : स्मिता वाघ विरुद्ध करण पवार
- रावेर : रक्षा खडसे विरुद्ध श्रीराम पाटील
हेही वाचा – पिंपरी चिंचवड महापालिकेचा उद्यान विभाग साकारणार हरीत मतदान केंद्र उपक्रम
- जालना : रावसाहेब दानवे विरुद्ध कल्याण काळे
- औरंगाबाद : संदिपराव भुमरे विरुद्ध चंद्रकांत खैरे
- बीड : पंकजा मुंडे विरुद्ध बजरंग मनोहर सोनवणे
- मावळ : श्रीरंग बर्णे विरुद्ध संजोग वाघरे पाटील
- पुणे : मुरलीधर मोहोळ विरुद्ध रवींद्र हेमराज डांगेकर
- शिरूर : शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे
- अहमदनगर : सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके
- शिर्डी : सदाशिव लोखंडे विरुद्ध भाऊसाहेब राजाराम.