अक्षय तृतीयेच्या तोंडावर सोन्याच्या किंमती वाढल्या; जाणून घ्या आजचे दर
![Gold prices rise ahead of Akshaya Tritiya; Know today's rates](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/Gold-Silver-Price-Today-780x470.jpg)
Gold-Silver Price Today | सोने आणि चांदीच्या ग्राहकांना महागाईचा झटका बसणार आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला आणि अक्षय तृतीयेच्या तोंडावर चांदीने १ हजारांची भरारी घेतली आहे तर सोन्याच्या किमतीतही काहीशी वाढ झाली आहे. १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७१,४३० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७१,६०० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ८३,०३० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ८१,८६० रुपये प्रतिकिलो होती.
हेही वाचा – लोकसभा निवडणूक रणसंग्राम : शिरुरमध्ये धडाडणार शरद पवारांची तोफ!
बुलियन मार्केट वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६५,३४० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ७१,२८० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,३४० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,२८० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,३४० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,२८० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ६५,३४० आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ७१,२८० रुपये आहे. याशिवाय अक्षय तृतीयेनंतर सोन्याच्या किमतीत ग्राहकांना दिलासा मिळू शकतो.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)