DAUND : आमदार राहुल कुल यांच्या खूनाचा कट ; राहू गावात बंद
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/1-3-1.jpg)
पुणे – दौंडचे रासपचे आमदार राहुल कुल यांना खुनाची धमकी देण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर या प्रकरणामुळे दौंडकरांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. याच्या निषेर्धात राहुतील ग्रामस्थांनी बंद पाळत निषेध सभेचे आयोजन केले. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी सोनवणे, कैलास गाढवे, सुधाकर थोरात, सरपंच सुरेखा शिंदे, नितीन कुंभार, किसन शिंदे, राहुल सोनवणे, अनिल सोनवणे, आदींनी मनोगत व्यक्त केले.
आमदार राहुल कुल यांना संपवणार आहोत, आमदारांची गाडी उडवणार आहोत, असा मेसेज पोलिस अधिक्षकांना पाठविण्याचा प्रकार नुकताच उघड़कीस आला. वरिष्ठ पातळीवरून याबाबत चक्रे फिरल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने संबंधीतांना जेरबंद केले मात्र याप्रकारामुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये गोंधळ उडाला आहे. राहू परिसरातील पाटेठाण, पिलानवाड़ी तसेच इतरही गावामध्येही निषेध नोंदविण्यात आला.
यवेळी शिवाजी सोनवणे म्हणाले, आमदार राहुल कुल यांच्या जिविताची मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी घेवुन त्यांना पोलिस संरक्षण द्यावे. गावातील नागरिकांनी आपले व्यवहार बंद ठेवत कड़कड़ीत बंद पाळला होता मात्र आमदार कुल यांच्या सुचनेनुसार नागरिकांनी व्यवहार पुर्ववत केले.