ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र
सराफ दुकानातील कामगारानेच केला दागिन्यांचा अपहार; पिंपरीतील घटना
कामगाराला अटक; पिंपरी पोलीस करताहेत पुढील तपास
पिंपरी : सराफ दुकानात काम करणाऱ्या कामगाराने दुकानातील ३ लाख १३ हजार किमतीच्या दागिन्यांचा अपहार केला. याप्रकरणी कामगाराला अटक करण्यात आली आहे. ही घटना २८ मार्च डिलक्स चौक, पिंपरी येथे ओंकार सराफ अँड ज्वेलर्स या दुकानात घडली.
अक्षय अशोक पोतदार (३५, रा. भोसरी. मूळ रा. सातारा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ओंकार जाधव (३८, रा. वाकड) यांनी पिंपरी ठाण्यात फिर्याद दिली आहे. जाधव यांचे डिलक्स चौकात सराफ दुकान आहे. दुकानात आरोपी अक्षय हा काम करत होता. त्याच्याकडे जाधव यांनी दुकान व कॅश काउंटरच्या चाव्या सोपवल्या होत्या. त्याचा गैरफायदा घेऊन अक्षयने ड्रॉवरमधून ४८.७२० ग्रॅम वजनाचे दागिन्यांचा अपहार केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कामगार अक्षय पोतदार याला अटक केली असून पिंपरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.