Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मैला शुद्धीकरण प्रकल्पात सौर उर्जा प्रकल्प

पिंपरी ( महा ई न्यूज ) – महापालिकेच्या वतीने सौर उर्जेतून वीज निर्मिती करण्यावर भर देण्यास सुरूवात केली आहे. ही पर्यावरणपूरक वीज वापरल्याने पालिकेची मोठी आर्थिक बचत होणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका भवन, ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयानंतर आता पालिका कासारवाडी, पिंपळे निलख, चिखली येथील मैला सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाच्या इमारतीवर सौर उर्जा पॅनेल बसविणार आहेत. या प्रकल्पातून  एकूण 85 किलो वॅट वीज निर्मिती केली जाणार आहे.

केंद्र व राज्य शासनाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना सौर उर्जेतून वीज निर्मिती करण्यावर भर देण्याचा सूचना दिल्या आहेत. तसेच, कार्यालय, आस्थापना, पथदिवे, सार्वजनिक ठिकाणे आदी सर्व ठिकाणी प्रमाणित एलईडी दिवे लावण्याची सक्ती केली आहे. त्यातून महावितरणकडून घेण्यात येणार्या वीजेचा वापर कमी होऊन, पर्यायाने स्थानिक स्वराज्य संस्थेची आर्थिक बचत होणार आहे.

पालिकेच्या विविध मैला सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पात सौर उर्जा प्रकल्प सुरू करण्यात येत आहे. कासारवाडीतील प्रकल्पात 45 किलो वॅट, पिंपळे निलखच्या प्रकल्पात 10 किलो वॅट आणि चिखलीच्या प्रकल्पात 25 किलो वॅटची वीज निर्मिती होणार आहे. ही मोफत वीज तेथेच वापरली जाणार आहे. त्यामुळे पालिकेच्या महावितरणाच्या वीज बिलात दरमहा मोठी आर्थिक बचत होणार आहे. या प्रकल्पासाठी 66 लाख 37 हजार रूपये खर्चास स्थायी समितीने 11 सप्टेंबरला मंजुरी दिली आहे. सौर उर्जा पॅनेल बसविण्याचे काम जी. के. एनर्जी मार्केटर्स देण्यात आले आहे.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड कंपनीच्या वतीने यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयाच्या इमारतीवर 147 किलो वॅट आणि सेक्टर 23 जलशुद्धीकरण केंद्रात 312 किलो वॅट वीज निर्मितीसाठी ‘रेस्को’ तत्वावर केली जाणार आहे. ही  वीज पालिका क्लीन मॅक्स कंपनीकडून 3 रूपये 62 पैसे दराने 25 वर्षे विकत घेणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group