रणबीर कपूरचे स्पेशल बर्थ-डे सेलिब्रेशन
रणबीर कपूरसाठी हे वर्ष “संजू’च्या दमदा यशामुळे खूपच चांगले ठरले. हे वर्ष त्याला फक्त करियरसाठीच नव्हे, तर खासगी जीवनासाठीही खूप लाभदायी ठरत आहे. एका मुलाखतीत त्याने आलिया भट्टशी लग्न करणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे सर्वत्र चर्चा रंगत असताना 28 सप्टेंबरला 36वा वाढदिवसाही त्याच्यासाठी खास ठरला. या दिवसाचे सेलिब्रेशन त्याने आई नीतू कपूर आणि आलिया भट्टसोबत केले.
नीतू कपूरने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत नीतू, रणबीर आणि आलिया बर्थ-डे सेलिब्रेशन करताना दिसतात. यात ब्ल्यू ड्रेसमध्ये आलिया खूपच सुंदर दिसत आहे. विशेष म्हणजे आलियाचा हा ड्रेस प्रसिद्ध फॅशन ब्रॅडचा असून त्याची किंमत अठराशे डॉलर म्हणजे सुमारे 1 लाख 30 हजार रूपये आहे.
दरम्यान, रणबीर कपूर सध्या “ब्रह्मास्र’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत आलिया भट्ट मुख्य भूमिका साकारत आहे. याशिवाय करण जोहरच्या “तख्त’ चित्रपटातही ही जोडी झळकणार आहे.