Breaking-newsक्रिडा

आयसीसी क्रमवारी : गोलंदाजीत जसप्रीत बुमराह अव्वल स्थानी कायम

Share On

नवी दिल्ली – आशिया कप सातव्यांदा आपल्या नावावर केल्यानंतर भारतीय संघाच्या खेळाडूंच्या एकदिवसीय क्रमवारीत मोठी सुधारणा झाली आहे. रविवारी आयसीसीव्दारे प्रसिध्द करण्यात आलेल्या क्रिकेटच्या एकदिवसीय क्रमवारीत फलंदाजीबरोबरच गोलंदाजीत देखील भारतीय खेळाडूंच अव्वल स्थानी आहेत.

आशिया कप स्पर्धेत गोलंदाजीत चांगली कामगिरी करणारा आणि आपल्या कामगिरीत सातत्य ठेवणारा भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आयसीसी एकदिवसीय गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानी कायम आहे. बुमराहचे एकूण 797 गुण आहेत.

दुसरीकडे भारतीय फिरकीपटू कुलदीप यादव याच्यां क्रमवारीत देखील चांगली सुधारणा झाली आहे. आशिया कपमध्ये कुलदीप यादवने 10 गडी बाद केले.या कामगिरीमुळे कुलदीप सहाव्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे. एकदिवसीय प्रकारात कुलदीपची ही आतापर्यंतची बेस्ट क्रमवारी ठरली आहे.

आयसीसी संघाच्या क्रमवारीत कोणताही बदल झालेला नसून इंग्लंड पहिल्या स्थानावर कायम आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर भारतीय संघ आहे, तर तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंड आहे. आशिया कपमुळे भारताला एका अंकाचा फायदा झाला असून भारताकडे 122 गुण आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button