‘पराभवाच्या भीतीने पुण्यात आलेल्या कर्तव्यशून्य चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांच्या पराभवाबद्दल बोलू नये’; काशिनाथ नखाते
![Kashinath Nakate said that Chandrakant Patal should not talk about Sharad Pawar's defeat](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/03/Kashinath-Nakate-780x470.jpg)
पिंपरी | ज्यांची कर्मभूमी कोल्हापूर आहे. जिथे राजर्षी शाहूंचा लढण्याचा वारसा असलेल्या कोल्हापूरतील एकाही मतदारसंघांमध्ये न लढता आपण निवडून येणार नाही याची भीती असल्याने कोथरूड मधल्या महिला आमदाराचे तिकीट कापून अन्याय करून स्वतः पुण्यात येऊन लढावं लागलं आशा चंद्रकांत पाटलांची अपराजित असलेल्या शरदचंद्र पवार यांच्यावर बोलण्याची पात्रता नाही अशी टीका राष्ट्रवादी असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी केली.
बारामती येथे चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांचा पराभव हेच आमचे अंतिम ध्येय असून बारामती विजय प्राप्त करण्यासाठी त्यांनी आटापिटा सुरू आहे, मात्र बारामती मधून सलग तीन वेळा सुप्रियाताई सुळे खासदार झाल्या आहेत आणि संसदरत्न आहेत. दुसऱ्याच्या मतदार संघात अपघाताने व परोपकराने एकवेळा निवडून आलेले आणि मंत्रीपद दोन वेळा मिळूनही काही जनहिताचे निर्णय न घेणारे पाटील यांनी आत्मपरीक्षण करावे. फुले शाहू आंबेडकरांचा अवमान करणे आणि लोकांच्या हिताची एकही काम न करणारे वाचाळवीर चंद्रकांत पाटील यांनी देशाच्या अतुलनीय नेतृत्वाबद्दल बोलताना विचार करावा. देशाचे नेते शरदचंद्र पवार विधानसभेचे ६ वेळा सदस्य राहिलेले आहेत, मुख्यमंत्री ४ वेळा, केंद्रीय मंत्री ४ वेळा राज्यसभा सदस्य २ वेळा राहिले आहेत आणि लोकप्रिय, लोकहिताचे, बहुजनांचे असंख्य निर्णय घेतलेले आहेत.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सफाई सेवकांकडून मतदानाची शपथ
ज्यांना कोल्हापूर सोडून पळ काढून दुसऱ्याच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघात यावे लागते यावरून त्यांचे कार्यकर्तृत्व दिसून येते. हिमालयाची उंची असणाऱ्या सह्याद्री म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते दिल्ली पुढेही न चुकलेला महाराष्ट्राचा सह्याद्री म्हणून त्यांना पाहिले जाते असे शरदचंद्र पवार हे नेहमीच विजयी झालेले आहेत त्यांना धोका देणाऱ्या अनेकांना घरी पाठवलेले आहे शरद पवार हे अपराजित राहतील यात शंकाच नाही.